Kolhapur Circuit Bench | सर्किट बेंचचे आज उद्घाटन

Kolhapur Circuit Bench
कोल्हापूर : सरन्यायाधीश भूषण गवई यांचे कोल्हापुरात शनिवारी सायंकाळी आगमन झाले. त्यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधिस्थळाला भेट देऊन अभिवादन केले. यावेळी उपस्थित खासदार शाहू महाराज, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अलोक अराधे, कोल्हापूर सर्किट बेंचचे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक, न्यायमूर्ती शिवकुमार दिगे, न्यायमूर्ती शर्मिला देशमुख, न्यायमूर्ती एस. जी. चपळगावकर, पुणे विभागाचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर मनपा आयुक्त के. मंजुलक्ष्मी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., पोलिस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, जिल्हा बार असो.चे अध्यक्ष अ‍ॅड. व्ही. आर. पाटील आदी.Pudhari File Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांनी उराशी जपलेले उच्च न्यायालयाचे सर्किट बेंचचे स्वप्न आज शाही सोहळ्याने साकार होत आहे. रविवार, दि. 17 ऑगस्ट 2025 या ऐतिहासिक सुवर्णदिनी, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश ना. भूषण गवई यांच्या शुभहस्ते कोल्हापूर सर्किट बेंचचे उद्घाटन होत आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ना. मकरंद कर्णिक हे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अलोक अराधे तसेच उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. अजित पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पालकमंत्री प्रकाश आबिटकर हेही यावेळी उपस्थित राहणार आहेत. भाऊसिंगजी रोडवरील न्यायालय इमारतीत रविवारी दुपारी 3.30 वाजता उद्घाटन सोहळा होणार आहे. त्यानंतर मेरी वेदर ग्राऊंड येथे उद्घाटनाचा जाहीर सोहळा पार पडणार आहे.

दरम्यान, भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे शनिवारी सायंकाळी पावणेसहा वाजता कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले. विमानतळावर सरन्यायाधीशांचे अतिशय उत्साहात स्वागत करण्यात आले. सरन्यायाधीशांनी व्यक्तिगतरीत्या सर्वांशी संवाद करत स्वागताचा स्वीकार केला.

कोल्हापूर सर्किट बेंचसाठी मुंबई उच्च न्यायालयाने नियुक्ती केलेले न्यायमूर्ती मकरंद कर्णिक, न्यायमूर्ती शिवकुमार दिगे, न्यायमूर्ती शर्मिला देशमुख, न्यायमूर्ती एस. जी. चपळगावकर यांनी त्यांचे प्रथम स्वागत केले. यावेळी विधी क्षेत्रातील अन्य मान्यवरही उपस्थित होते.

त्यानंतर खासदार शाहू महाराज, राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, राज्याचे ग्राहक तक्रार निवारण आयुक्तालयाचे अध्यक्ष सुरेंद्र तावडे, आ. सतेज पाटील, आ. जयंत आसगावकर, आ. विनय कोरे, आ. अमल महाडिक, आ. अशोकराव माने, आ. राहुल आवाडे, पुणे विभागाचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, कोल्हापूर विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्त के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., पोलिस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरजकुमार बच्चू यांनी त्यांचे स्वागत केले.

विमानतळावरून शहराकडे रवाना होताना उजळाईवाडी येथे उचगाव, कणेरी, कणेरीवाडी, गोकुळ शिरगाव, तामगाव, नेर्ली, सरनोबतवाडी या गावांतील काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाहनांच्या ताफ्यावर पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत केले. सरन्यायाधीश गवई यांनीही काचा खाली करून सर्वांना नमस्कार करत त्यांच्या स्वागताचा स्वीकार केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news