Child Death Incident | रोडरोलरखाली चिमुरडीचा अंत

वरणगेत रस्त्याच्या कामादरम्यान दुर्घटना
Child Death Incident |
Child Death Incident | रोडरोलरखाली चिमुरडीचा अंत
Published on
Updated on

प्रयाग चिखली : करवीर तालुक्यातील वरणगे-पाडळी येेथे रस्त्याच्या कामादरम्यान रोडरोलरखाली सापडून चिमुरडीचा मृत्यू झाला. मोनिका रवी चव्हाण (वय २ वर्षे ८ महिने, रा. आकेर्ली, ता. विजापूर) असे तिचे नाव आहे. ही घटना शनिवारी घडली.

रस्त्यावर टाकलेली खडी समतोल करण्याचे काम रोडरोलरच्या सहाय्याने सुरू होते. जवळच खेळत असलेली मोनिका रोडरोलरच्या पुढील चाकाखाली सापडल्याने गंभीर जखमी झाली. तिला तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. तिच्या पश्चात आई, वडील असा परिवार आहे. करवीर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news