Bribery Case | तीस हजारांची लाच घेताना मुख्य सेविकेसह ठेकेदार जाळ्यात

 Bribe Case
Bribe Case Pudhari
Published on
Updated on

इचलकरंजी : अंगणवाड्यांचे शालेय अन्न पुरवठ्याचे सहा महिन्यांचे थकीत बिल मंजूर करून देण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयातील मुख्य सेविका मेनका मनोहर माने-कोरवी (रा.कोरोची) आणि खासगी ठेकेदार दीपक दिनकर कांबळे (४९, इचलकरंजी) या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. सोमवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. संशयिताच्या घरांची झडतीही घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

शहरातील अंगणवाड्यांना बचत गटामार्फत शालेय अन्न पुरवठा योजनेअंतर्गत शालेय पोषण आहार दिला जातो. त्यातील ११ अंगणवाड्यांचे मागील सहा महिन्यांचे शालेय अन्न पुरवठा योजनेचे बिल थकीत होते. हे बिल बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाकडून मंजूर करून घेण्यासाठी प्रत्येक अंगणवाडीकडून महिना ५०० रुपयेप्रमाणे ३३ हजार रुपये लाचेची मागणी तक्रारदार यांच्याकडे केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी केली असता तडजोडीअंती मुख्य सेविका मेनका माने यांनी ३० हजार रुपये मागणी केल्याचे आणि त्यांच्या कार्यालयातील ठेकेदार दीपक कांबळे याच्याकडे हे ३० हजार रुपये देण्यास सांगितल्याचेे निष्पन्न झाले. ही रक्कम स्वीकारताना कांबळेला रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी गावभाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. याबाबत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप, हवालदार संदीप काशीद, सुधीर पाटील, संगीता गावडे, कृष्णा पाटील, वैभव खोत, गजानन कुराडे यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news