मुख्यमंत्री शिंदे आज जिल्हा दौर्‍यावर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही उपस्थिती : शिवसेना मेळावा, विविध विकासकामांचा प्रारंभ
Chief Minister Shinde on district tour today
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूर दौर्‍यावर.Pudhari File Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बुधवारी जिल्ह्यातील विविध विकासकामांचा प्रारंभ होणार आहे. धामणी धरणाची घळभरणी, गारगोटी येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि कोल्हापूर शहरातील विविध विकासकामांचा प्रारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे. पूर्वनियोजित दौर्‍यानुसार शेंडा पार्क येथील 1,100 खाटांच्या रुग्णालयाचे भूमिपूजन आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते होणार होते; मात्र हे कार्यक्रम त्यांच्या दौर्‍यातून रात्री उशिरा वगळण्यात आले. तपोवन मैदानात रात्री आठ वाजता होणार्‍या जाहीर सभेला ते उपस्थित राहणार होते; मात्र आता ते या सभेला उपस्थित राहणार नाहीत. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार हेही कोल्हापूर दौर्‍यावर येणार आहेत.

मुख्यमंत्री शिंदे यांचे दुपारी सव्वाचार वाजता मानबेट येथील हेलिपॅडवर आगमन होईल. यानंतर त्यांच्या हस्ते धामणी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची घळभरणी होईल. यानंतर ते हेलिकॉप्टरने गारगोटीकडे रवाना होतील. सायंकाळी पाच वाजता गारगोटी येथे त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन होणार आहे. गारगोटीहून मोटारीने सायंकाळी पावणेसात वाजता त्यांचे कोल्हापुरात दसरा चौकात आगमन होईल. या ठिकाणी शहरातील विविध विकासकामांचा प्रारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवारही कोल्हापूर दौर्‍यावर येत असून, दुपारी सव्वाचार वाजता पवार यांचे विमानतळावर आगमन होईल. यानंतर त्यांच्या हस्ते कागल तालुक्यातील विविध विकासकामांचे उद्घाटन होणार आहे. सायंकाळी पावणेसात वाजता होणार्‍या जिल्हा बँकेच्या आणि आठ वाजता होणार्‍या शेंडा पार्क येथील 1100 खाटांच्या रुग्णालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमास ते उपस्थित राहणार आहेत. तेथून साडेआठ वाजता ते विमानतळाकडे रवाना होणार असून तेथून ते मुंबईला जाणार आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news