

वारणानगर : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणार्या श्री क्षेत्र जोतिबा मंदिर विकास आराखड्यासाठी पहिल्या टप्प्यात 259 कोटींचा निधी मंजूर केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे व सर्व जोतिबा भक्तांच्या वतीने ‘केदार विजय’ ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला.
मुख्यमंत्री शुकवारी कोल्हापूर दौर्यावर असताना आमदार डॉ. कोरे यांनी भेट घेतली. यावेळी जोतिबा मंदिर विकासासाठी निधी मंजूर केल्याबद्दल कोरे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. यावेळी हातकणंगलेचे आमदार दलितमित्र डॉ. अशोकराव माने, जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम आदी मान्यवर उपस्थित होते.