kolhapur | मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी केली प्रस्तावित खंडपीठ जागेची पाहणी

सर्किट बेंचमध्ये दिवसभर कामकाज; शेंडा पार्कात वृक्षारोपण
कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी गुरुवारी सर्किट बेंच आवारातील नव्या कोर्टरूमचे उद्घाटन करण्यात आले.
कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी गुरुवारी सर्किट बेंच आवारातील नव्या कोर्टरूमचे उद्घाटन करण्यात आले. (छाया : नाज ट्रेनर)
Published on
Updated on

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी शेंडा पार्क येथील प्रस्तावित खंडपीठासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या 23 एकर जागेची गुरुवारी सायंकाळी पाहणी केली. तत्पूर्वी दिवसभर त्यांनी सर्किट बेंचमध्ये डिव्हीजन बेंचचे न्यायमूर्ती माधव जामदार यांच्यासोबत कामकाज पाहिले.

मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांचे गुरुवारी सकाळी सव्वा नऊ वाजता दोन दिवसांच्या कोल्हापूर दौर्‍यासाठी आगमन झाले. विमानतळावरून सर्किट बेंच येथे आगमन झाल्यानंतर त्यांना पोलिस दलाकडून मानवंदना देण्यात आली. यानंतर सकाळी दहा वाजता त्यांच्या हस्ते इमारतीत नव्या कोर्टरूमचे उद्घाटन झाले. यानंतर त्यांनी दिवसभर डिव्हीजन बेंचमध्ये कामकाज पाहिले.

यावेळी डिव्हीजन बेंचचे न्यायमूर्ती जामदार, न्यायमूर्ती ए. एल. पानसरे, न्यायमूर्ती एम. डब्ल्यू. चंदवाणी, न्यायमूर्ती प्रवीण पाटील, न्यायमूर्ती सचिन देशमुख, न्यायमूर्ती रणजित भोसले, महाधिवक्ता मिलिंद साठे, अतिरीक्त सॉलिसीटर जनरल अनिल सिंग, मुख्य सरकारी वकील शिशिर हिरे, नेहा भिडे, सरकारी वकील पंकज देवकर, श्रीराम चौधरी, नितीन पाटील, विकास माळी, तेजपाल इंगळे, श्रीकृष्ण गणबावले उपस्थित होते.

खंडपीठाच्या जागेत वृक्षारोपण

यानंतर प्रस्तावित खंडपीठाच्या जागेत मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले. यावेळी सर्किट बेंचमधील न्यायमूर्ती यांच्यासह महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांच्यासह महसूल, विधी व न्याय, सार्वजनिक बांधकाम विभागांतील अधिकारी उपस्थित होते.

शेंडा पार्कात अतिरिक्त 62 एकर जागेचा प्रस्ताव

मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी सायंकाळी खंडपीठासाठी शेंडा पार्क येथे मंजूर झालेल्या 23 एकर जागेची पाहणी केली. यावेळी अतिरिक्त 62 एकर जागेचाही प्रस्ताव राज्य शासनाला देण्यात आला असून, त्याचा पाठपुरावा सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले. जागेच्या नकाशाद्वारे महसूल अधिकार्‍यांकडून माहिती घेतली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news