‘खंडोबा’-‘जुना बुधवार’ यांच्यात चंद्रकांत चषकासाठी उद्या फायनल

दुसर्‍या उपांत्य सामन्यात यजमान बालगोपाल तालीम पराभूत
Chandrakant Cup final between ‘Khandoba’ and ‘Juna Budhwar
कोल्हापूर : बालगोपाल तालीम विरुद्ध संयुक्त जुना बुधवार यांच्यातील सामन्याचा एक क्षण. Pudhari File Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (दि. 13) दुपारी 4 वाजता, छत्रपती शाहू स्टेडियमवर रंगणार आहे. खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध संयुक्त जुना बुधवार पेठ फुटबॉल क्लब यांच्यात ही लढत होणार आहे. यात बाजी मारत 2 लाख 31 हजार व मानाचा चंद्रकांत चषक कोण पटकावणार? याकडे तमाम फुटबॉलप्रेमींचे लक्ष लागले आहे.

यजमानांचे आव्हान संपुष्टात

कै. आमदार चंद्रकांत जाधव चषक 2025 फुटबॉल स्पर्धेचे आयोजन बालगोपाल तालीम मंडळातर्फे करण्यात आले आहे. स्पर्धेतील उपांत्य फेरीतील दुसरा सामना शुक्रवारी यजमान बालगोपाल तालीम विरुद्ध संयुक्त जुना बुधवार पेठ फुटबॉल क्लब यांच्यात झाला. यात जुना बुधवार संघाने बालगोपालला सामन्यात संपूर्णवेळ 2-2 असे बरोबरीत रोखले. यामुळे निकालासाठीच्या टायब्रेकरमध्ये जुना बुधवारने 4-2 असा विजय मिळवत अंतिम फेरीत मुसंडी मारली.

संपूर्णवेळ सामना 2-2 बरोबरीत

सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांकडून आक्रमक पवित्र्यासह जलद खेळ झाला. बालगोपालकडून 10 व्या मिनिटाला झालेल्या चढाईत जुना बुधवारचा बचावपटू उत्सव मरळकर याचा गोलक्षेत्रात हॅण्डबॉल झाला. यामुळे मुख्य पंचांनी पेनल्टीचा निर्णय दिला. यावर जॉर्ज कोम याने गोल नोंदवत मध्यंतरापर्यंत बालगोपालला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात या गोलची परतफेड जुना बुधवारकडून 43 व्या मिनिटाला झाली. बालगोपालच्या गोलक्षेत्रातील गोंधळाचा फायदा उठवत टी. एम. विष्णूने गोल करून सामना 1-1 असा बरोबरीत केला. यानंतर दुसर्‍याच मिनिटाला (44) बालगोपालच्या सागर पोवारने गोल नोंदवून संघाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली.

सामन्याच्या जादा वेळेत 80+5 रोहित मंडलिकच्या फ्री किक पासवर सनवीर सिंग याने गोल नोंदवत सामना 2-2 असा बरोबरीत केला. सामन्यात नियमबाह्य खेळ करणार्‍या दोन्ही संघांतील प्रथमेश जाधव, सनवीर सिंग व संकेत जरग यांना ‘यलो’ तर पृथ्वीराज निकम यांच्यावर रेड कार्डची कारवाई करण्यात आली.

टायब्रेकरमध्ये जुना बुधवारची सरशी

सामना 2-2 बरोबरीत झाल्यानंतर निकाल टायब्रेकरवर झाला. यात जुना बुधवारकडून टी. एम. विष्णू, तेजस जाधव, रोहित मंडलिक, सनवीर सिंग यांनी पेनल्टी स्ट्रोकवर बिनचूक गोल केले. तर उत्तरादाखल बालगोपालकडून प्रतीक पोवार व जॉर्ज कोम यांना गोलची परतफेड करता आली. त्यांच्या ऋतुराज पाटील व प्रथमेश जाधव यांचे फटके दिशाहिन ठरल्याने बाहेर गेले. यामुळे सामना जुना बुधवारने 4-2 असा जिंकला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news