

कोल्हापूर : दूध उत्पादकांना दिलेली आश्वासने पूर्ण केली असून आतापर्यंत बारा रुपये दरवाढ दिली आहे. गोकुळ भविष्यात फार मोठा होणार असून त्यामध्ये अपशकून करून कोणी अडथळा करू नये, असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. विधानसभा मतदारसंघ संख्या वाढणार असल्याने भविष्यात चंद्रदीप नरके-राहुल पाटील मित्र म्हणून समोर येतील, असेही त्यांनी सांगितले.
कै. पी. एन. पाटील यांनी आयुष्यभर काँग्रेसची निष्ठेने सेवा केली. आता त्यांची मुले भवितव्याचा विचार करून इतर पक्षात जात असतील, तर आमदार सतेज पाटील यांनी एवढे हळवे होऊ नये, असा टोलाही एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांना लगावला.
गोकुळमध्ये सध्या गाजत असलेल्या जाजम व घड्याळ खरेदीवर बोलताना मुश्रीफ यांनी याचा खुलासा गोकुळ प्रशासनाने केला असून गोकुळमध्ये कोणी अपशकून करू नये, असे सांगितले. ‘नरके यांच्या विरोधात आपण असणारच’ या राहुल पाटील यांच्या वक्तव्यावर बोलताना मुश्रीफ म्हणाले, आपला गट टिकविण्यासाठी अशी वक्तव्य करावी लागतात. पाटील यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीला हत्तीचे बळ मिळणार आहे. खंडपीठ स्थापनेची प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल. यामुळे कोल्हापूरच्या विकासाचे महाद्वार खुले होईल. जिल्ह्याचा जीडीपी वाढेल. यासाठी शहराची हद्दवाढ, शेंडा पार्क येथे आयटी पार्क होणे आवश्यक असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.
शक्तिपीठ महामार्ग न लादता शेतकर्यांना विश्वासात घेऊनच होईल, या भूमिकेवर आजही मी ठाम आहे. दि. 15 ऑगस्ट रोजी शिवारात ध्वजारोहण करताना सतेज पाटील यांनी नितीन राऊत यांनाही त्यांना बोलावायला हवे होते, असा चिमटाही मुश्रीफ यांनी काढला.
पाटील बंधूंच्या प्रवेशाने राष्ट्रवादीला हत्तीचे बळ कोल्हापूर जिल्ह्यात मत चोरीचा अद्याप एकही आरोप नाही शहरातील रस्त्यांसाठी लवकरच निधी आणू सतेज पाटील यांनी इतकेही हळवे होऊ नये.