

वारणावती : चांदोली धरण परिसरात गेल्या चार दिवसांपासून अतिवृष्टी सुरू आहे. गेल्या 24 तासांत 99 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दमदार पावसामुळे धरणात सध्या 11939 क्युसेक पाण्याची आवक होत असल्याने धरण 50 टक्के भरले आहे. बंद असणारी वीज निर्मितीही सुरू झाली आहे. वीज निर्मिती केंद्रातून 1219 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे.
पाऊस आणि विसर्गामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. गतवर्षी आजअखेर 195 मिलिमीटर पावसाची येथे नोंद झाली होती, यंदा मात्र 498 मिलिमीटर पाऊस बरसला आहे. सध्या धरणाची पाणी पातळी 606.35 मीटर आहे. पाणीसाठा 17.15 टीएमसी आहे.