Gaur Death Kolhapur | चंदगडमध्ये थरार : दोन गवा रेड्यांची झुंज; चार दिवसांनंतर जखमी गव्याचा मृत्यू

रवळनाथ मंदिराजवळ शुक्रवारी सकाळी रवी गडकरी यांच्या शेतात दोन गवा रेड्यांची झुंज
Gaur Injury Death Chandgad
चंदगड : रवळनाथ मंदिराजवळ दोन गवा रेड्यांच्या झुंजीत एका गव्याचा मृत्यू झालाPudhari
Published on
Updated on

Gaur Injury Death Chandgad

चंदगड : जैवविविधतेने नटलेल्या चंदगड तालुक्यात अतिसंवेदनशील प्राण्यांचा प्राण्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढतच आहे. अशातच त्या त्या जंगल परिक्षेत्रात वर्चस्व मिळवण्यासाठी वन्य प्राण्यांअंतर्गत झगडा होतो. अशाच प्रकारे वर्चस्व स्थापन करण्यासाठी दोन नर जातीच्या गवा रेड्यांमध्ये झुंज लागून एक गवा रेडा जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. हा थरार चंदगड शहरातील रवळनाथ मंदिरापासून एक किलोमीटर अंतरावर घडला. मृत गव्यावर मंगळवारी (दि. ५) सायंकाळी दहन करून दफन करण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, चंदगड येथील प्रसिद्ध रवळनाथ मंदिरापासून एक किमी अंतरावर शुक्रवारी सकाळी रवी गडकरी यांच्या शेतात दोन गवा रेड्यांची झुंज सुरू झाली. ही झुंज बराच काळ सुरू होती. हळूहळू ही बातमी चंदगड शहरातील नागरिकांना समजतात घटनास्थळी गर्दी वाढत होती.

Gaur Injury Death Chandgad
kolhapur Crime News : अश्लील ऑडिओ क्लिप पाठवून महिलेचा विनयभंग; दोघांना अटक

यादरम्यान वन खात्याकडून सुतळी बॉम्ब टाकून ही झुंज सोडवण्याचा प्रयत्न झाला. ब्रह्मदेव नगर येथील अनेकांनी याबाबतचे व्हिडिओ चित्रित केले. या झुंजीमध्ये दुसऱ्या गवी रेड्याच्या पायाला पहिल्या गवी रेड्याचे शिंग समोरील डाव्या पायात अडकल्याने त्या गवी रेड्याचा पाय मोडला. त्याची मोठी दमछाक ही झाली.

यानंतर गत चार दिवस त्याच्यावर कोल्हापूर येथील वनखात्याचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष वाळवेकर व डॉ. अमित कुंभार यांच्या वैद्यकीय पथकाने उपचार केले. मात्र, उपचारास प्रतिसाद न मिळता जखमी गव्याचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला.

Gaur Injury Death Chandgad
kolhapur Crime News | थरकाप..! पाच वर्षांत 623 बालकांवर अत्याचार

घटनास्थळी चंदगड वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल तुषार गायकवाड, कृष्णा डेळेकर, वनपाल चंद्रकांत पावसकर यांच्या उपस्थितीत पंचनामा करून जंगलामध्ये या मृत गव्याचे दफन करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news