कोल्हापूर : चंदगडला धुवाधार पाऊस; १३ बंधारे पाचव्या दिवशीही पाण्याखाली

File Photo
File Photo
Published on
Updated on

चंदगड; पुढारी वृत्तसेवा : चंदगड तालुक्यातील पश्चिम भागात धुवांधार पाऊस कोसळत असून आज (दि. २३) पाचव्या दिवशीही १३ बंधारे पाण्याखाली राहिल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पिळणी गावाचा गेल्या पाच दिवसांचा संपर्क तुटला आहे. या गावातील लोकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे. कोवाड येथे आज (दि. २३) दुसऱ्या दिवशीही पूरस्थिती जैसे थे होती. तिलारी वीज घर आणि परिसराला पावसाने झोडपून काढले आहे. या परिसरात तब्बल १६५ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.

दरम्यान नदी नाल्यांच्या पाणी प्रवाहात वाढ झाल्याने आपत्ती व्यवस्थापनाने आजपासून (दि. २३) ऑगस्टपर्यंत पर्यटकांना चंदगड तालुक्यातील सर्वच पर्यटन स्थळांवर जाण्यास बंदी घातली आहे.

जंगमहट्टी धरणात आज (दि. २३) अखेर ५७.५० टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. घटप्रभा प्रकल्पांतर्गत असलेल्या कोल्हापूर टाईप बंधाऱ्यावर पाणी आले आहे. पिळणी, भोगोली, हिंडगाव, कानडी, सावर्डे, अडकूर, तारेवाडी या बंधाऱ्यावर पाणी आले आहे. तसेच जांभरे प्रकल्पावरील चंदगड, कुर्तनवाडी, हल्लारवाडी, कोकरे, न्हावेली आणि कोवाड बंधाऱ्यावर पाणी आले आहे. आज सकाळी संपलेल्या २४ तासात चंदगड तालुक्यात सरासरी ९१.४ मिलिमीटर पाऊस कोसळला. मंडल निहायमध्ये नागनवाडी येथे ४४.३, माणगाव ४२.१, कोवाड २८.७, तुर्केवाडी ५१.४, हेरे ७२ आणि चंदगड ५४.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. घरांचीही पडझड सुरूच असून नांदवडे येथील नामदेव गुंडू गावडे व चंदगड येथील आशपाक अफजल माणगावकर यांच्या घरांच्या भिंती कोसळून मोठे नुकसान झाले.

पर्यटकांवर बंदी आदेश

संभाव्य अतिवृष्टीमुळे सुंडी धबधवा, किटवाड धवधवा, बाबा धबधवा, स्वप्नवेल पॉईंट, तिलारी घाट, पारगड किल्ला, गंधर्वगड किल्ला, कलानंदिगड किल्ला, महिपाळगड किल्ला, फाटकवाडी धरण, जांबरे धरण, जंगमहट्टी धरण, या ठिकाणी पर्यटकांसाठी व स्थानिक लोकांना प्रतिबंधित करण्यात आल्याचे आदेश तहसीलदार राजेश चव्हाण यांनी दिले आहेत.

चंदगड तालुक्यातील सुंडी धबधबा, किटवाड धबधबा बाबा धबधबा, स्वप्नवेल पॉईंट, तिलारी घाट,पारगड किल्ला, गंधर्वगड किल्ला, कलानंदिगड किल्ला, महिपाळगड किल्ला, फाटकवाडी धरण, जांबरे धरण, जंगमहट्टी धरण ही पर्यंटन स्थळे आहेत. पासाळयात या ठिकाणी पर्यंटक मोठया प्रमाणात भेट देत असतात . या ठिकाणी नेटवर्क नसल्याने बऱ्याच पर्यटकांशी संपर्क होत नाही. तसेच तिलारी धरणाच्या सांडव्यामध्ये जूनमध्ये २ पर्यटक पोहोयला गेल्यानंतर बुडून मयत झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच चंदगड तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असलेने नदी, नाले, ओढे पात्राबाहेर पडलेले आहेत. पिळणी, भोगोली, हिंडगाव, सावर्डे अडकूर, कोनेवाडी-करंजगाव, हेरे चंदगड बंधा-यावर पाणी आल्याने या मार्गांवरील वाहतूक बंद आहे.

चंदगड तालुक्यामध्ये येणा-या पर्यटक व नागरिकांच्या जिवीतास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. यासाठी खबरदारी उपाय म्हणून दि. २३ ते ३ ऑगस्ट पर्यंत पर्यटन स्थळांकडे पर्यटनासाठी जाऊ नये असे आवाहन तहसिलदार चव्हाण यांनी केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news