Chandgad News | घटप्रभा मध्यम प्रकल्प ९१.९२ टक्के भरला

घटप्रभा नदीकाठी धोक्याचा इशारा, धरणाची क्षमता १.५५ टीएमसी
Chandgad News
file photoFile Photo
Published on
Updated on

चंदगड : फाटकवाडी (ता. चंदगड) येथील घटप्रभा मध्यम प्रकल्प शुक्रवारी (दि. ३) सायंकाळी ४ वाजता ९१.९२ टक्के इतक्या क्षमतेने भरला आहे. या धरणाची क्षमता १.५५ टीएमसी इतकी आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या सततच्या पर्जन्यवृष्टीमुळे शनिवारी (दि. ४) सकाळी किंवा दुपारपर्यंत सदर प्रकल्प १०० टक्के भरण्याची शक्यता आहे.

त्या अनुषंगाने धरणाची सुरक्षितता विचारात घेऊन शुक्रवारी (दि. ३) सायंकाळी सहा वाजता घटप्रभा नदीपात्रात जलविद्युत केंद्रामधून ४५० क्युसेक इतका विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे घटप्रभा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. घटप्रभा धरणापासून सुमारे १० किमी अंतरावर सिंधुदुर्ग जिल्ह्याची हद्द सुरू होते. त्यामुळे या धरण परिसरात परिसरात मोठी पर्जन्यवृष्टी सुरू आहे. दरवर्षी सर्वप्रथम हा प्रकल्प भरतो. यंदाही शनिवारी हा प्रकल्प भरण्याची शक्यता आहे. विसर्ग सुरू असल्याने

कोणतीही जीवित अथवा वित्त हानी होऊ नये याकरिता नदीकाठा शेजारी असणाऱ्या गावांनी, शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी, नदी शेजारी गावांमध्ये दवंडी देऊन जागृती करावी, नदीपात्रात कोणीही प्रवेश करू नये, शेतातील पाण्याच्या मोटारी कृषी पंप अथवा इतर मौल्यवान साहित्य सुरक्षित स्थळी हलवावी, असे आवाहन पाटबंधारे खात्याचे सहाय्यक अभियंता संजय पाटील, घटप्रभा शाखाधिकारी अजय देसाई व दिग्विजय कुंभार यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news