Kolhapur News : चंदगडमधील बारा एकर सरकारी जमिनीची परस्पर विक्री

उपजिल्हाधिकाऱ्यांचा बनावट आदेश, खोट्या शिक्क्याचा वापर : मुगळीतील एकावर गुन्हा
Land Scam
Land ScamFile Pudhari
Published on
Updated on

चंदगड : जिल्हाधिकारी कार्यालयाचा बनावट शिक्क्याचा वापर करत उपजिल्हाधिकाऱ्यांचा बनावट आदेश चंदगड तहसील कार्यालयास सादर करून मळवीवाडी (ता. चंदगड) येथील १२ एकर सरकारी जमीन परत परस्पर विकण्यात आली. या गैर कृत्याला जबाबदार धरून तातोबा भिकाजी गावडा (वय ४२, रा. मुगळी ता. चंदगड) याच्यावर चंदगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

याबाबतची फिर्याद प्रभारी नायब तहसीलदार शशिकांत बापूसाहेब किल्लेदार (वय ५१, सध्या रा. हरळी खुर्द, ता. गडहिंग्लज) यांनी दिली. मागील दहा महिन्यांपासून हा प्रकार सुरू आहे. तातोबा गावडे याने जिल्हाधिकारी कार्यालयाचा खोटा शिक्का वापरून तसेच खोटी डिजिटल सहीने आदेश पारित करून वर्ग २ ची जमीन वर्ग १ करून दिली.

मळवीवाडी (ता. चंदगड) गावातील जमीन गट क्र. २३० ही सरकारी मालकीची आहे. अपर जिल्हाधिकारी यांचा बनावट आदेश पारित करून तो खरा असल्याचे चंदगड तहसील कार्यालयास भासवून वर्ग २ ची असलेली जमीन वर्ग १ मध्ये करून विलास गणपती पाटील, अरुण गणपती पाटील, नारायण गणपती पाटील, परशराम गणपती पाटील (सर्व रा. तुडये, ता. चंदगड) यांचे नावे करवून घेतली. ही शासनाची फसवणूक करून सदर कोट्यवधी रुपयांची १२ एकर जमीन परस्पर २९ लाखाला नोंदणीकृत खरेदीदस्ताने तिसऱ्याला विक्री केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news