Chandgad Crime | वाग्दत्त वधूस चुकीचा मेसेज केला म्हणून कोयत्याने हल्ला!

कडलगे खुर्द येथील एका तरुणावर गुन्हा दाखल
Crime News
Crime Newspudhari photo
Published on
Updated on

चंदगड : मनसेचे माजी जिल्हा उपाध्यक्ष‌ व शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते प्रताप ऊर्फ पिनू गणपत पाटील ( वय ४०, रा. तुर्केवाडी, ता. चंदगड ) यांच्यावर कोयत्याने हल्ला केल्या प्रकरणी गणेश शंकर कांबळे (वय ३०, रा. कडलगे खुर्द, ता. चंदगड ) या तरुणावर चंदगड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

गणेश याच्या वाग्दत्त वधूस काहीतरी चुकीचा मेसेज करण्यात आला आहे. या रागापोटी वाद निर्माण झाला होता. याबाबत प्रताप समझोता करण्याचे प्रयत्न करत होते. यादरम्यान प्रताप यांना गुरूवारी (दि. ३०) सकाळी ११ वाजता ढोलगरवाडी फाटा येथे गणेश याने बोलावून घेऊन डोक्यात व उजव्या पायाच्या गुडघ्याच्या खाली कोयत्याने हल्ला करून गंभीर जखमी केले.

प्रताप यांच्यावर बेळगाव येथे खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. अधिक तपास पोलीस निरीक्षक निंगाप्पा चौखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल रमेश पाटील करत आहेत. भर दिवसा ही घटना घडल्याने चंदगड तालुक्यात खळबळ उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news