Chandgad Crime | मद्यपी मुलाकडून आई - वडिलांवर कोयत्याने हल्ला

चंदगड तालुक्यातील सातवणे येथील घटना
Crime News
Crime Newspudhari photo
Published on
Updated on

चंदगड : मद्यपी तरुणाने स्वतःच्या आई-वडिलावर कोयत्याने हल्ला चढवत गंभीर जखमी केल्याची घटना सातवणे (ता. चंदगड) येथे बुधवारी (दि. २९) सायंकाळी सात वाजता घडली. याप्रकरणी दशरथ सुरेश पारसे ( वय ३०, रा. चाळोबा मंदिर जवळ, सातवणे ) या तरुणावर चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

त्याचे वडील सुरेश शंकर पारसे (वय ६१) व त्याची आई नंदा सुरेश पारसे (वय ५५) असे जखमी झालेल्यांची नावे आहेत. राहत्या घरातील देवघरात दशरथ झोपला होता. यावेळी नंदा यांना दारूचा वास येत असल्याचे त्यांनी पती सुरेश यांना सांगितले. हे संभाषण ऐकून दशरथ चिडला. यादरम्यान दशरथ याने अश्लील शिवीगाळ करत देवघरात ठेवलेला कोयता घेऊन प्रथम वडील सुरेश यांच्या डोकीवर वर्मी घाव घातला. त्याचवेळी दशरथ याला सोडवून घेण्यासाठी गेलेल्या त्यांच्या आई नंदा पुढे सरसावल्या. यावेळी दशरथ याने नंदा यांच्या उजव्या हाताच्या पंजावर कोयत्याने हल्ला चढवला.

घटनास्थळी दोघेही रक्तबंबळ झाले. यानंतर चंदगड येथे ग्रामीण रुग्णालयात दाखल करून अधिक उपचारासाठी गडहिंग्लज येथे व त्यानंतर नागणवाडी फाटा येथील खाजगी रुग्णालयात जखमी दांपत्यावर उपचार सुरू आहेत. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल तुकाराम राजिगरे करत आहेत. आरोपीला रात्री उशिरापर्यंत अटक करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news