Chandgad Accident : हेरे येथे कारच्या धडकेत शेवाळेचा दुचाकीस्वार जागीच ठार

Chandgad Accident : हेरे येथे कारच्या धडकेत शेवाळेचा दुचाकीस्वार जागीच ठार
Published on: 
Updated on: 

चंदगड : हेरे येथील आठवडा बाजार आटोपून दुचाकीवरून आपल्या गावी परतणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाचा भरधाव कारच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. शंकर विष्णू गावडे (वय ६७, रा. शेवाळे, ता. चंदगड) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी कारचालक अभय अशोक रेवणकर (रा. वडगाव, ता. जि. बेळगाव) याच्याविरुद्ध चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शंकर गावडे हे शनिवारी हेरे येथील आठवडा बाजार संपवून दुचाकीवरून मोटनवाडी रस्त्याने शेवाळे गावाकडे जात होते. हेरे गावच्या हद्दीतील ताम्रपर्णी नदीच्या पुढील बाजूस आले असता, समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या भीषण धडकेत गावडे यांच्या डाव्या पायाला व मांडीला गंभीर फ्रॅक्चर झाले. अतिरिक्त रक्तस्त्राव आणि गंभीर दुखापतीमुळे त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

याप्रकरणी मृताचा मुलगा जानबा शंकर गावडे यांनी चंदगड पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार निष्काळजीपणे व भरधाव वेगाने वाहन चालवल्याप्रकरणी कारचालक अभय रेवणकर याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक ए. बी. शेख करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news