‌Pudhari Chaitrapalavi event: ‘पुढारी‌’, ‌‘तालचक्र‌’ आयोजित चैत्रपालवी सोहळा आज रंगणार

सूर, ताल आणि नृत्याचा तिहेरी संगम...
Pudhari Chaitrapalavi event
Pudhari Chaitrapalavi eventPudhari
Published on
Updated on

कोल्हापूर : भारतीय संस्कृतीतील महत्त्वाचा सण आणि हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणजेच ‌‘गुढीपाडवा‌’ या मांगल्याच्या उत्सवाचे स्वागत करण्यासाठी ‌‘तालचक्र‌’ आणि ‌‘पुढारी पब्लिकेशन्स प्रा. लि.‌’ यांच्या संयुक्त विद्यमाने व पुनित बालन ग््रुाप यांच्या सहकार्याने भारतीय शास्त्रीय संगीत आणि नृत्याच्या समृद्ध परंपरेला समर्पित असा ‌‘चैत्रपालवी - तालचक्र‌’ हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला आहे. गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला या कार्यक्रमाच्या माध्यमातून कोल्हापूर शहरामध्ये सूर आणि ताल यांच्या साथीत कलेची गुढी उभारली जाणार आहे.

कोल्हापूर येथील सोहळ्यासाठी चंदुकाका सराफ ज्वेल्स्‌‍ हे ज्वेलरी पार्टनर आहेत. या महोत्सवाचे खास वैशिष्ट्य म्हणजे दोन सत्रांमधून रसिकांना मिळणारा सांगीतिक आनंद. पहिल्या सत्रात ताल, स्वर आणि नृत्य यांचा सुरेख संगम पाहायला मिळेल. यामध्ये पद्मश्री विजय घाटे यांचा जादूई तबला, कथक नृत्यांगना शीतल कोलवलकर यांचे नृत्य, गायक सुरंजन खंडाळकर यांचे गायन आणि हार्मेानियमवर यशवंत थिटे यांची साथ लाभणार आहे.

दुसऱ्या सत्रात ख्यातनाम गायिका विदुषी देवकी पंडित यांची मंत्रमुग्ध करणारी गायन मैफल रंगणार असून, त्यांना तबला साथ प्रशांत पांडव आणि हार्मेानियम साथ अभिनय रवांदेे यांची लाभणार आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी हा कार्यक्रम रसिकांना एक अविस्मरणीय आणि प्रसन्न अनुभव देणारा ठरेल.

या कार्यक्रमाला प्रवेश मोफत असून, प्रवेशिका आवश्यक आहे, एक प्रवेशिका फक्त एका व्यक्तीसाठी वैध असणार आहे. गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला सुरांच्या या चैत्रपालवीचा आनंद घेण्यासाठी सर्व संगीतप्रेमी व कला रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ‌‘तालचक्र‌’ आणि ‌‘पुढारी‌’ परिवारातर्फे करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क विजय : 8149582442, अमर : 9545327545.

कार्यक्रमाच्या मोफत प्रवेशिका टोमॅटो एफएम ऑफिस वसंत प्लाझा, आयसीआयसीआय बँकेच्या वर बागल चौक, दैनिक ‌‘पुढारी‌’ ऑफिस भाऊसिंगजी रोड, चंदुकाका सराफ ज्वेल्स्‌‍, रॉयल मिरज आर्केड, रेल्वे स्थानकासमोर, कोल्हापूर येथे सकाळी 11 ते 2 या वेळेत प्रवेशिका उपलब्ध राहतील. तसेच, कार्यक्रम स्थळी उपलब्ध.

कार्यक्रमाची वेळ आणि ठिकाण

18 मार्च 2026, सायंकाळी 6 नंतर, डॉ. व्ही. टी. पाटील मेमोरियल हॉल (कमला कॉलेज), राजारामपुरी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news