kolhapur | नृत्य-सुरांच्या साथीने उभारणार ‘कलेची गुढी’; गुढीपाडवा पूर्वसंध्येला ‘चैत्रपालवी तालचक्र’
कोल्हापूर : हिंदू नववर्षाचा उत्साह आणि मांगल्याचा सण असलेल्या ‘गुढीपाडव्या’च्या स्वागताच्या निमित्ताने भारतीय शास्त्रीय संगीत आणि नृत्याची समृद्ध परंपरा अनुभवण्याची सुवर्णसंधी कोल्हापूरकरांना मिळणार आहे. ‘तालचक्र’ आणि ‘पुढारी’ पब्लिकेशन्स प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच पुनित बालन ग्रुप यांच्या सहकार्याने आयोजित ‘चैत्रपालवी - तालचक्र’ हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला रंगणार आहे.
कोल्हापूर येथील या सोहळ्यासाठी चंदुकाका सराफ ज्वेल्स हे ज्वेलरी पार्टनर म्हणून जोडले गेले आहेत. कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली असून रसिकांमध्ये या सांगीतिक मेजवानीबाबत मोठी उत्सुकता आहे. कार्यक्रमाची दोन विशेष सत्रे असून हा महोत्सव दोन वैविध्यपूर्ण सत्रांमध्ये विभागलेला असून, रसिकांना एकाच व्यासपीठावर वादन, नृत्य आणि गायनाचा त्रिवेणी संगम अनुभवता येईल. पहिल्या सत्रात ताल, स्वर आणि नृत्याचा संगम असून या सत्रात प्रसिद्ध तबला नवाज पद्मश्री विजय घाटे यांच्या बोटांची जादू अनुभवता येईल. त्यांना साथ देतील प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना शीतल कोलवलकर, सुश्राव्य गायक सुरंजन खांडाळकर आणि हार्मोनियमवर असतील यशवंत थिटे.
दुसर्या सत्रात विदुषी देवकी पंडित यांचे गायन सादर होणार आहे. यावेळी देवकी पंडित आपल्या गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध करतील. त्यांना तबल्यावर प्रशांत पांडव, तर हार्मोनियमवर अभिनय रावांडे यांची साथ लाभणार आहे.
कार्यक्रमाच्या मोफत प्रवेशिका
टोमॅटो एफएम कार्यालय, वसंत प्लाझा, आयसीआयसीआय बँकेच्या वर, बागल चौक, ‘पुढारी भवन’, भाऊसिंगजी रोड आणि चंदूकाका सराफ आणि ज्वेल्स, स्टेशन रोड, कोल्हापूर येथे 12 ते 5.30 या वेळेत मोफत प्रवेशिका संपेपर्यंत उपलब्ध राहतील.
कार्यक्रमाची वेळ आणि ठिकाण
बुधवार, 18 मार्च,
सायंकाळी 6 वाजता,
डॉ. व्ही. टी. पाटील मेमोरियल हॉल (कमला कॉलेज), राजारामपुरी, कोल्हापूर

