Government Digital University | डिजिटल युनिव्हर्सिटीची नवी पहाट.. घरबसल्या शिक्षणाची सापडली वाट..!

व्हर्च्युअल लॅबद्वारे विद्यार्थ्यांसाठी प्रॅक्टिकल; घरबसल्या कमी खर्चात कोर्सेस पूर्ण करता येणार
Government Digital University
Government Digital University | डिजिटल युनिव्हर्सिटीची नवी पहाट.. घरबसल्या शिक्षणाची सापडली वाट..!
Published on
Updated on

प्रवीण मस्के

कोल्हापूर : शैक्षणिक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर झपाट्याने वाढत असताना विद्यार्थ्यांना आणखी एक नवीन संधी उपलब्ध झाली आहे. केंद्र सरकारने ‘सरकारी डिजिटल युनिव्हर्सिटी’ सुरू केली असून, विद्यार्थ्यांना आता घरबसल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सिक्युरिटी, डेटा सायन्ससारखे कोर्सेस घरबसल्या कमी खर्चात पूर्ण करता येणार आहेत.

केंद्र सरकारने 2030 पर्यंत देशातील सुमारे 40 तरुणांना डिजिटल आणि नवीन टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट्ये ठेवले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांसाठी डिजिटल युनिव्हर्सिटी, नाईलिट डिजिटल युनिव्हर्सिटी सुरू झाली आहे. ‘एनडीयू’चे सर्व कोर्सेस हे ऑनलाईन असणार आहेत. विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयी व गतीनुसार अनेक कोर्सेससाठी नोंदणी करता येते. विशेष म्हणजे, यातील बहुतांश सर्व कोर्स ऑनलाईन असणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांना व्हर्च्युअल लॅबच्या माध्यमातून प्रॅक्टिकलची व्यवस्था करण्यात आली आहे.

ऑनलाईन पद्धतीने शिकवणी, मार्गदर्शन व परीक्षेची सुविधा मिळणार असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील. विद्यार्थ्यांना व्हर्च्युअल लॅब, रेकॉर्ड केलेल्या व्याख्यानांद्वारे तसेच तज्ज्ञ प्राध्यापकांशी थेट संवाद साधण्याची सुविधा मिळणार आहे. त्यामुळे ‘घरबसल्या शिक्षण’ या संकल्पनेला नवा आयाम प्राप्त होणार आहे. डिजिटल युनिव्हर्सिटीमार्फत देशभरातील उद्योगक्षेत्राशी संलग्न कोर्सेस उपलब्ध करून दिले जाणार आहे.

प्रवेश प्रक्रियाही ऑनलाईन

सरकारी डिजिटल युनिव्हर्सिटीच्या अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश प्रक्रियाही पूर्णतः ऑनलाईन असून, पर्वी.वळसळींरश्र या संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे. विविध क्षेत्रांमध्ये अभ्यासक्रम राबवण्याची तयारी सुरू असून, पुढील वर्षभरात या कोर्सेसची व्याप्ती आणखी वाढवण्यात येणार आहे. युनिव्हर्सिटीच्या शिक्षणाच्या नव्या युगाची सुरुवात विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news