बांधकाम उद्योगाची चिंता वाढणार; पाच महिन्यांनंतर सिमेंट दरात वाढ

मोजक्याच कंपन्या शिल्लक राहिल्याने दरवाढीची चिंता
Cement Price Hike
बांधकाम उद्योगाची चिंता वाढणारfile photo
Published on
Updated on

कोल्हापूर ः पुढारी वृत्तसेवा

पाच महिने सिमेंटच्या किमती स्थिर राहिल्यानंतर डिसेंबरमध्ये सिमेंटच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. पावसाळा त्यानंतर आलेले सण यामध्ये मजुरांची उपलब्धता वाढल्यामुळे रिअल इस्टेट क्षेत्रात सिमेंटची मागणी वाढली आहे. तसेच मोठ्या पायाभूत प्रकल्पांमध्येही सिमेंटची मागणी कायम असल्याने या महिन्यात सिमेंटच्या किमतीत वाढ झाली. सिमेंट उद्योगातील बड्या कंपन्यांचे अधिग्रहण होऊन काही मोजक्याच कंपन्या शिल्लक राहिल्याने किमती वाढत राहतील, असा अंदाज बांधकाम क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत.

Cement Price Hike
परभणी : पूर्णेतील टी-पॉईंट कॉर्नर येथील‌ सिमेंट रोडचे बांधकाम रखडले

पश्चिम भारतात 50 किलो सिमेंटच्या पोत्याच्या किमतींमध्ये 5 ते 10 रुपयांची वाढ झाली असून, सध्याच्या किमती 350 ते 400 रुपयांदरम्यान आहेत. उत्तर भारतात दिल्लीसह अनेक भागांमध्ये पोत्यामागे 20 रुपयांनी वाढ झाली असून, किमती 340 ते 395 रुपयांदरम्यान आहेत. दक्षिण भारतात सिमेंटची मागणी नेहमीच कमी असते. त्यामुळे किमती कमी असतात. पण, तिथेही पोत्यामागे 40 रुपयांपर्यंत किंमत वाढली आहे. सध्या दक्षिण भारतात दर प्रति बॅग 320 रुपयांवर पोहोचले आहेत. पूर्व भारतातही काही महिने दर स्थिर राहिल्यानंतर सिमेंट बॅगची किंमत 30 रुपयांनी वाढली आहे. इनक्रेड इक्विटीजच्या अहवालातील अंदाजानुसार, डिसेंबर महिन्यात सरासरी भागांमध्ये सिमेंटच्या किमती प्रति बॅग 10-15 रुपयांनी वाढतील, या अहवालात म्हटले आहे की, 2025 आर्थिक वर्षाच्या दुसर्‍या टप्प्यात सरकारचा भांडवली खर्च अजून वाढणार आहे, त्यामुळे सिमेंटच्या मागणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. पण वाढीव उत्पादन क्षमतेमुळे मोठ्या प्रमाणावर दरवाढ नको, अशी मागणी आताच उद्योगातून सुरू झाली

आहे. क्रिडाई कोल्हापूरचे उपाध्यक्ष सचिन ओसवाल म्हणाले, ‘भारतीय सिमेंट उद्योगात मोठ्या प्रमाणावर विलीनीकरण सुरू आहे. त्यामुळे काही कंपन्यांचा मक्तेदारी होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे सिमेंटच्या किमतीत वाढ होण्याचा धोका आहे. याचा परिणाम बांधकाम क्षेत्रावर ताण वाढण्यात होईल. त्यामुळे 2025 हे वर्ष बांधकाम व्यवसायावर अतिरिक्त ताण देणारे असेल.

Cement Price Hike
Pune : शिरोलीतील सिमेंट काँक्रीट रस्त्याला पडल्या भेगा

सिमेंट उद्योगातील वर्षभरातील मोठी अधिग्रहणे

  1. अदाणी ग्रुप : अंबुजा सिमेंटस् आणि एसीसी विलीनीकरण

  2. अल्ट्राटेक सिमेंट : इंडिया सिमेंटस्चे अधिग्रहण

  3. अदाणी ग्रुप : अंबुजा सिमेंटस् आणि एसीसीचे अधिग्रहण (2022)

  4. अदाणी ग्रुप : पेनना सिमेंट इंडस्ट्रीजचे अधिग्रहण

  5. अदाणी ग्रुप : सांघी इंडस्ट्रीजचे अधिग्रहण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news