

कोल्हापूर : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणार्या दहावी, बारावीच्या परीक्षा लवकरच सुरू होणार आहेत. यंदा कॉपीमुक्त परीक्षेसाठी कोल्हापूर बोर्डाने कंबर कसली असून प्रत्येक परीक्षा केंद्रावर ‘सीसीटीव्ही’चा वॉच असणार आहे.
यंदा बारावीची लेखी परीक्षा 11 फेब—ुवारीपासून सुरू होत असून कोल्हापूर विभागीय मंडळाकडून तयारी सुरू आहे. परिरक्षकांसह भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. दहावीच्या परीक्षेला 21 फेब—ुवारीपासून प्रारंभ होणार आहे. अतिविशेष विलंब शुल्कासह परीक्षा अर्ज परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत भरता येणार आहेत. विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशपूर्व परीक्षेची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा. राज्य मंडळास परीक्षांचा निकाल वेळेत लावता यावा, यासाठी या वर्षापासून हा बदल करण्यात आला आहे. परीक्षा केंद्रावर कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी भौतिक सोयी-सुविधांसह सीसीटीव्ही बंधनकारक करण्यात आले आहे.
यंदा दहावी, बारावीच्या परीक्षा 10 ते 15 दिवस अगोदरच सुरू होत आहेत. ऐन परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना येणारा ताण कमी करण्यासाठी व तणावमुक्त परीक्षेसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. समुपदेशकांकडून विद्यार्थी व पालक यांच्या मनातील भीती, शंका व अडचणी सोडविण्यासाठी समुपदेशक मदत करणार आहेत. विभागीय मंडळाच्या संकेतस्थळावर समुपदेशकांचे मोबाईल क्रमांक लवकरच उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांच्या लॉगीनमध्ये बारावीचे प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. राज्य मंडळाच्या ुुु. ारहरहीीललेरीव. ळप या संकेतस्थळावर 10 जानेवारीपासून प्रवेशपत्र उपलब्ध होणार आहेत. डाऊनलोड करताना काही तांत्रिक अडचणी आल्यास विभागीय मंडळ कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.