kolhapur | कोर्ट आवारात जातिवाचक शिवीगाळ; 15 वकिलांवर गुन्हा

जिल्हा न्यायालयात 7 मार्च रोजी घडला होता वादावादीचा प्रकार
kolhapur Crime News |
kolhapur | कोर्ट आवारात जातिवाचक शिवीगाळ; 15 वकिलांवर गुन्हा File Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : कोर्ट आवारात जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी जिल्हा बार असोसिएशनच्या अध्यक्षांसह 15 वकिलांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. अश्विनी ऊर्फ पल्लवी निखिल पाटील (रा. वारणा कोडोली, ता. पन्हाळा) यांनी शनिवारी फिर्याद दिली. अश्विनी पाटील या न्यायालय आवारात महिला वकिलास झालेल्या मारहाणीतील संशयित आहेत.

अश्विनी यांचे पती निखिल यांनी दाखल केलेल्या घटस्फोटाच्या दाव्यावर जिल्हा व सत्र न्यायालयात 7 मार्चच्या सुनावणीनंतर फिर्यादी व त्यांचे पती यांच्यात न्यायालयाच्या तळमजल्यात दुपारी वादावादी झाली. अश्विनी व निखिल यांच्या वकील अ‍ॅड. काजल शेळके यांच्यामध्येही वाद झाला. सुमारे दोन ते तीन तास वादावादी सुरू होती. यानंतर अश्विनी यांनी याप्रकरणी कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये तक्रार दाखल केली. या तक्रारीची चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने शाहूपुरी पोलिसांना दिले होते. त्यानुसार पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

शाहूपुरी पोलिसांत अश्विनी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अ‍ॅड. व्ही. आर. पाटील, विवेक घाटगे, काजल शेळके, मनीषा सातपुते, साक्षी निकम, हर्षा खंडेलवाला, संदीप चौगुले, संदीप देशपांडे, नारायण भांदिगरे, सूरज भोसले, स्वाती तनवाडे, तृप्ती किनरे, विद्या कांबळे-देशमुख, जे. जे. देसाई, शिल्पा सुतार यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news