

मुरगूड : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या तरुणाने या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी लैंगिक संबंध ठेवल्याने ती तीन महिन्यांची गर्भवती राहिली. त्यानंतर या पीडित मुलीने मुरगूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार भुदरगड तालुक्यातील गिरगाव येथील सचिन निनाप्पा लिंगरे (वय 21, रा. गिरगाव, धनगरवाडा, ता. भुदरगड) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला.