कोल्हापूर : पूर्ववैमनस्यातून तलवार हल्ला प्रकरणी नऊ जणांविरुद्ध गुन्हा

भोई गल्लीत अद्यापही तणाव; हल्ल्यात चौघे गंभीर; एक ताब्यात
Case against nine people in sword attack case
अरबाज बागवानPudhari File Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : रविवार पेठ भोई गल्लीत गुरुवारी रात्री पूर्ववैमनस्यातून झालेल्या तलवार, एडका, चाकू हल्ला प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. त्यापैकी अरबाज बागवान याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या हल्ल्यात चौघे गंभीर जखमी झाले आहेत. दोन गटांत झालेल्या या वादामुळे अद्याप वातावरण तणावपूर्ण आहे.

रोहन सचिन कांबळे (वय 29, रा. भोई गल्ली) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार फैजल पठाण, सलमान ऊर्फ पिड्या बागवान, साहिल शेख, आशिष महात, अल्ताफ मणेर, मुबीन बागवान, अश्पाक महात, अरबाज बागवान, सिराज महात (सर्व रा. महात गल्ली, रविवार पेठ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी व आरोपी रविवार पेठेतच राहतात. गुरुवारी रात्री 9.30 वाजता न्यू स्टार फ्रेंड सर्कल, भोई गल्ली येथे संशयित 9 आरोपींनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून निलेश यादव याला गाडी साईडला घेण्याच्या कारणावरून मारहाण केली. त्याबाबत रोहन कांबळे व निलेश यादव, सचिन मोरे, अक्षय पवार आदी त्यांना विचारणा करण्याबाबत गेले असता फैजल पठाण, सलमान ऊर्फ पिड्या बागवन, साहिल शेख, आशिष महात, अल्ताफ मणेर, मुबीन बागवान, अश्पाक महात, अरबाज बागवान, सिराज महात यांनी कांबळे, यादव यांना तुम्ही आमच्या इथे का आलाय? ह्यांची लय नाटकी झालीत. आता सोडायचं नाही, संपवून टाकायचं असे म्हणून ठार मारायची धमकी दिली. तसेच शिविगाळ करून हातातील चाकू, तलवार, एडका, काठी अशा हत्याराने कांबळे, यादव यांच्या डोक्यात, डोळ्यात, हातावर, पायावर मारून गंभीर जखमी केले. दरम्यान, वरील नऊजणांनी तलवार, एडका आणि चाकूने केलेल्या हल्ल्यात रोहन कांबळे, निलेश यादव, सचिन मोरे, अभय पवार हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news