कोल्हापूर : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर निवड व मार्गदर्शन

कोल्हापूर : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर निवड व मार्गदर्शन

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा  :  दहावी-बारावीच्या परीक्षा संपता-संपताच घराघरात विद्यार्थ्यांचे करिअर, पुढील शिक्षण याविषयी चर्चा सुरू होते; मात्र अनेकदा विद्यार्थ्यांप्रमाणेच पालकही याबाबत संभ्रमात असतात. डोळसपणे सर्व बाबींचा विचार करून योग्य मार्गदर्शन घेणे महत्त्वाचे आहे. यासाठी दै. 'पुढारी', पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट आणि पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन सेमिनार आयोजित केला आहे.

सेमिनारमध्ये ज्येष्ठ करिअर मार्गदर्शक विवेक वेलणकर हे '10वी, 12वी नंतरच्या करिअरच्या संधी' तसेच पीसीईटीचे डिजिटल मार्केटिंग हेड व पीसीसीओई, पुणेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. केतन संजय देसले हे 'विविध शाखांच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रिया 2024' आणि पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी, पुणेच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. रामदास बिरादार हे '12 वी नंतरच्या शिक्षणाचे विविध पर्याय' या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमानंतर व्याख्याते विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.

साधारणतः आठवीपासूनच बारावीनंतरच्या करिअरची दिशा ठरवावी लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांनाही या कार्यक्रमात विनामूल्य प्रवेशासह करिअरबाबत योग्य मार्गदर्शन केले जाणार आहे.

त्यामुळे या व्याख्यानास बारावीच्या विद्यार्थ्यांसोबतच आठवी, नववी, दहावी, अकरावीचे विद्यार्थी आणि पालक यांनाही याचा विनामूल्य लाभ घेता येणार आहे. दहावी-बारावी बोर्ड परीक्षेनंतर विद्यार्थ्यांच्या मनात पुढील करिअरविषयक गोंधळाची स्थिती असते.

आज विद्यार्थ्यांसमोर करिअरची अनेक क्षेत्रे खुली आहेत. त्यामधून योग्य करिअर निवडणे विद्यार्थ्यांसाठी कठीण जाते. आपले भविष्य घडवणारे कोणते करिअर याबाबत संभ्रम किंवा तणावाखाली असणार्‍या विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार करिअर निवडीसंदर्भात तसेच करिअर संधींबाबत तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून विनामूल्य मार्गदर्शन तसेच समुपदेशन करण्यात येणार आहे.

कार्यक्रमात कोणत्या शाखेची निवड करावी, शाखानिहाय विविध शासकीय तसेच खासगी कॉलेज कोणती, प्रवेश प्रक्रिया, अर्ज कसे करावेत, प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती, मार्केटमधील आवाहन आयोजकांनी केले आहे. करिअर ट्रेंड कोणता याबाबत सखोल माहिती देत अभियांत्रिकीसाठी प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांच्या मनातील अनेक शंकांचे निरसन केले जाणार आहे. कार्यक्रमात सहभागासाठी प्रवेश विनामूल्य आहे.

व्याख्यानात सहभागासाठी नावनोंदणीची गरज असून विद्यार्थी पालकांनी सोबत दिलेल्या क्यूआर कोडला स्कॅन करून किंवा https://t.ly/jxwca या लिंक वर जाऊन नाव नोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. तसेच अधिक माहितीसाठी 9834433274 या क्रमांकांवर संपर्क साधावा.

व्याख्यानाचा विषय, वेळ, स्थळ

विषय : 10 वी आणि 12 वी नंतरच्या विविध क्षेत्रातील शिक्षण व करिअरच्या संधी
तारीख : गुरुवार, 20 जून 2024
वेळ : सकाळी 10:30 वाजता
स्थळ : शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर
प्रवेश विनामूल्य

  • इंजिनिअरिंग, डिझाईन, आर्किटेक्चर, आर्टस्, कॉमर्स, एम. बी. ए., फार्मसी, मीडिया अश्या विविध क्षेत्रांतील शिक्षण आणि करिअरच्या संधी याबाबत विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन
  • करिअरबाबत पालकांची भूमिका, विविध शाखांच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात तयारी कशी करावी?
  • 'पीसीएम'मध्ये 45 टक्क्यांपेक्षा कमी गुण असल्यास कोणते शैक्षणिक पर्याय उपलब्ध आहेत.
  • मागील वर्षाचे कॉलेजचे कटऑफ, शैक्षणिक कर्ज व स्कॉलरशीपबद्दलची माहिती
  • बी. व्होकेशनल कोर्स तसेच वर्किंग प्रोफेशनल्ससाठीच्या कोर्सेसबदद्लची माहिती

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news