

कोल्हापूर : दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष पुढील प्रवेश प्रक्रियेकडे लागले आहे. करिअरच्या वाटा शोधणार्या विद्यार्थ्यांना योग्य दिशा दाखवण्यासाठी दैनिक ‘पुढारी’चे लोकप्रिय आणि बहुप्रतीक्षित ‘एज्युदिशा 2026’ शैक्षणिक प्रदर्शन सज्ज झाले आहे. यावर्षी हे प्रदर्शन कोल्हापूर, सातारा आणि सांगली या तीन शहरांमध्ये आयोजित केले जाणार असून, शैक्षणिक संस्थांसाठी स्टॉल बुकिंग प्रक्रिया आता सुरू झाली आहे.
एकाच छताखाली करिअरचे अगणित पर्याय
या प्रदर्शनात इंजिनिअरिंग, मेडिकल, डिफेन्स, फार्मासोबतच आताच्या काळातील एआय (अख), डेटा सायन्स, रोबोटिक्स, अॅग्रो टेक आणि डिझाईन यांसारख्या आधुनिक क्षेत्रांतील संधींची माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे.
संजय घोडावत युनिव्हर्सिटी कोल्हापूर हे या उपक्रमाचे मुख्य प्रायोजक असून पावर्ड बाय प्रायोजक विश्वकर्मा युनिव्हर्सिटी (पुणे) आहेत. सहयोगी प्रायोजक एमआयटी विश्वप्रयाग युनिव्हर्सिटी, तर सहप्रायोजक म्हणून चाटे ग्रुप सहभागी झाले आहेत.
शैक्षणिक संस्थांसाठी सुवर्णसंधी
पुणे, मुंबईसह देशभरातील नामांकित शिक्षण संस्था या प्रदर्शनात सहभागी होत आहेत. थेट विद्यार्थ्यांशी आणि पालकांशी संवाद साधण्यासाठी हे एक प्रभावी व्यासपीठ आहे. यावर्षी प्रदर्शनात करिअर मार्गदर्शनासोबतच ‘न्यू एज स्किल्स’ आणि ‘ग्लोबल स्टडी ऑपॉर्च्युनिटीज’ यावर विशेष भर दिला जाणार आहे. आपल्या शैक्षणिक संस्थेचे नाव हजारो विद्यार्थी आणि पालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि प्रदर्शनातील आपला स्टॉल निश्चित करण्यासाठी या क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन दैनिक ‘पुढारी’तर्फे करण्यात आले आहे.
आपल्या शैक्षणिक संस्थेचे नाव हजारो विद्यार्थी आणि पालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि प्रदर्शनातील आपला स्टॉल निश्चित करण्यासाठी या क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन दैनिक ‘पुढारी’तर्फे करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क ः 8149582442, 9545327545.
या प्रदर्शनात काय असेल खास?
थेट संवाद : कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील हजारो गरजू विद्यार्थी आणि पालकांशी थेट संपर्क
व्यापक प्रसिद्धी : दैनिक ‘पुढारी’सह ‘पुढारी न्यूज’, एफएम ऑनलाईन आणि डिजिटल माध्यमातून राज्यभर प्रसिद्धी
तज्ज्ञांचे मार्गदर्शन : करिअर समुपदेशन सत्रांमुळे सर्व शाखांकडील विद्यार्थ्यांचा मोठा ओढा
आधुनिक कोर्सेसची मांडणी : एआय, प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग, मॅन्युफॅक्चरिंग, रिसर्च यांसारख्या क्षेत्रातील कोर्सेसना व्यासपीठ.
भविष्याचा अचूक वेध घेणार्या या शैक्षणिक महाकुंभात आपला सहभाग नोंदवून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ.