candidate family threat | उमेदवाराच्या पती, मुलास दमदाटी, धमकी

candidate family threat
candidate family threat | उमेदवाराच्या पती, मुलास दमदाटी, धमकीfile photo
Published on
Updated on

यड्राव : तारदाळ येथील मतदान केंद्रावर मतदान यंत्रणेची माहिती घेण्यासाठी गेलेल्या जि.प. उमेदवार सौ. दीपाली विनोद कोराणे यांना दमदाटी करून पती व मुलास शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी राहुल ढवळे, रणजित माने, अमोल माळी (सर्व रा. तारदाळ) यांच्यासह दहा ते पंधरा अनोळखी व्यक्तींविरोधात विनोद दत्तात्रय कोराणे (वय 41, रा. हनुमाननगर, तारदाळ) यांनी शहापूर पोलिसांत फिर्याद दिली आहे.

सौ. दीपाली विनोद कोराणे या कोरोची मतदारसंघातून जिल्हा परिषद निवडणूक 2025-2026 मध्ये महाविकास आघाडीकडून उमेदवार आहेत. दुपारी 3 च्या सुमारास जी.के.नगर, तारदाळ येथील अंगणवाडीमधील बूथ क्र. 13 बाहेर मैदानात तक्रारदार व पत्नी मतदान केंद्रावरील यंत्रणेबाबत विचारणा करण्यासाठी गेले होते. यावेळी संशयित आरोपींनी दमदाटी करून तक्रारदार व तक्रारदार यांच्या मुलास शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान, दुपारी मतदान केंद्राबाहेर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी सौम्य लाठीमार करीत गर्दी पांगवली. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांनी मतदान केंद्राला भेट देत कारवाईची मागणी केली. तसेच, निवडणूक पारदर्शकपणे पाडण्यासाठी परिसरातील सर्व गुन्हेगारांना हद्दपार केले जाते. मात्र, रेकॉर्डवरील हे गुन्हेगार येथे आहेतच कसे, असा सवाल उपस्थित केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news