पेठवडगावात बंद घराचे कुलूप तोडून चोरी; वीस लाखाचा ऐवज लंपास

दत्तनगरातही सोने व रोख रक्‍कम केली लंपास
Burglary in Pethwadgaon after breaking the lock of a locked house; Property worth Rs. 20 lakhs looted
पेठवडगावात बंद घराचे कुलप तोडून चोरी; वीस लाखाचा ऐवज लंपासFile Photo
Published on
Updated on

पेठवडगाव : राजकुमार चौगुले

येथील कोल्हापूर रोडवर असणाऱ्या सचिन दत्तात्रय कदम यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून वीस तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम दोन लाख असा सुमारे अठरा लाखांचा ऐवज लंपास केला. याचवेळी दत्तनगर येथेही अशाच प्रकाराने सोने व रोख रक्कम लंपास करण्यात आली.

येथील कोल्हापूर रोडवर गणेश मंदिरसमोर सचिन दत्तात्रय कदम राहतात. पुणे येथे नातेवाईकांचे लग्न असल्याने ते शुक्रवारी दुपारी घराला कुलूप लावुन सहकुटुंब पुण्याला गेले होते. या घरावर चोरट्यांनी पाळत ठेवत घरी कुणी नसल्याचे पाहून शनिवारी मध्यरात्री दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील तिजोरी कटावणीने उचकटली. आतील साहित्य विस्कटण्यात आले. लॉकर तोडण्यात आले. लॉकर मधील दोन नेकलेस, कोल्हापुरी साज, चेन, दोन मोठ्या अंगठ्या, आठ लहान अंगठ्या, मोहनमाळ असे सुमारे वीस तोळे सोन्याचे दागिने व आई सुमन कदम यांच्या पेन्शनचे काढून आणलेली दोन लाख रुपये इतकी रक्कम असा सुमारे सतरा ते अठरा लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.

अशाच पद्धतीने दत्तनगर येथील बाबासो नामदेव पाटील हेही आपल्या कुटुंबियांसह शाहूवाडी तालुक्यातील विरळे या ठिकाणी गेले होते. त्यांच्या लगतच्या घरांना कड्या घालण्यात आल्या. त्यांच्याही घराचे कुलुप तोडून तिजोरी कटावणीने उचकटुन तिजोरीतील चार ग्रॅमची अंगठी, सोन्याचे मणी व रोख रक्कम १७ हजार असा पाऊण लाख रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला.

वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास भोसले, स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सपोनि कैलास कोडक यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. श्वानपथक व ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. याबाबत वडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news