House Burglary | प्रयाग चिखली येथे दोन घरे फोडून ११ तोळे दागिने लंपास

चोरट्यांनी फोडलेले कपाट.
चोरट्यांनी फोडलेले कपाट.
Published on
Updated on

प्रयाग चिखली : करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली येथे रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी सरदार गल्लीतील दोन कुलूपबंद घरे फोडून सुमारे ११ तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. एका ब्युटी पार्लरचे दुकान आणि कासाराचे दुकान फोडण्याचाही चोरट्यांनी प्रयत्न केला.

दरम्यान, करवीरचे डीवायएसपी सुजितकुमार क्षीरसागर व पोलिस निरीक्षक रवींद्र कळंबकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. ठसेतज्ज्ञ व श्वानपथकाच्या मदतीने तपास सुरू आहे. हरी वसंत झिरंगे हे कुटुंबासह तुळजापूर येथे देवदर्शनासाठी गेले होते. तर लक्ष्मण लोहार सुट्टीनिमित्त बाहेरगावी होते. चोरट्यांनी दोन्ही घरांची कुलपे तोडून प्रवेश केला आणि तिजोऱ्या फोडून चोरी केली. यामध्ये हरी झिरंगे यांच्या घरातील सुमारे ११ तोळे सोने चोरीस गेल्याचे सांगण्यात आले. तर लक्ष्मण लोहार यांच्या घरातील तिजोरी फोडून २० हजार रुपये रोख रकमेसह एक लाख रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला. चोरटे चारचाकीतून आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. चोरी करताना चोरट्यांनी आजूबाजूच्या चार ते सहा घरांच्या बाहेरील कड्या लावून घेतल्याचेही समोर आले आहे.

ग्रा.पं.चे सीसीटीव्ही कुचकामी

ग्रामपंचायतीने काही महिन्यांपूर्वी मोठा गाजावाजा करत गावामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. मात्र, बसवल्यानंतर काही दिवसांपासून बहुतांश सीसीटीव्ही बंद असल्याचे दिसून आले. त्यामुळे तपासात अडचणी निर्माण झाल्या आहेत. याबाबत पोलिसांनी ग्रामपंचायत प्रशासनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news