Crime News : भावाने भावाची सहा लाखांची सुपारी देऊन केला खून

निमशिरगावच्या तरुणाच्या खुनाचा उलगडा
brother murder case
Crime News : भावाने भावाची सहा लाखांची सुपारी देऊन केला खूनPudhari File Photo
Published on
Updated on

जयसिंगपूर : तमदलगे (ता. शिरोळ) येथे डोंगरावर झालेल्या निमशिरगावच्या तरुणाच्या खुनाचा उलगडा झाला असून, सख्ख्या भावानेच सहा लाख रुपयांची सुपारी देऊन खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.

याप्रकरणी भाऊ जिनगोंडा ओमगोंडा पाटील (वय 37, रा. निमशिरगाव), मोहन प्रकाश पाटील (33, रा. निमशिरगाव), राकेश ऊर्फ विनोद वसंत थोरात (23, रा. कुंभोज रोड, दानोळी), किरण आमाण्णा थोरात (27, रा. धनगरवाडा, दानोळी), सागर भीमराव लोहार (30) व अमर रामदास वडर (33, रा. दिलदार चौक भादोले, ता. हातकणंगले) या सहाजणांना जयसिंगपूर पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

मंगळवारी सकाळी तमदलगे डोंगरावर फिरायला गेलेल्या नागरिकांना अविनाश ऊर्फ दीपक ओमगोंडा पाटील (रा. निमशिरगाव) याचा मृतदेह दिसून आला होता. निर्जनस्थळी तीक्ष्ण हत्याराने खून झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले होते. त्यानंतर जयसिंगपूर पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीच्या आधारे तपास यंत्रणा गतिमान केली होती.

मृत अविनाश याचा भाऊ जिनगोंडा पाटील याच्यावर संशय आल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केल्यानंतर अविनाश हा दररोज दारू पिऊन घरी भांडण करतो. मुलांना, पत्नीला मारहाण करीत असल्याने त्याला कंटाळून मित्र मोहन पाटीलसह राकेश थोरात यांना बोलावून अविनाशला ठार मारण्याची सुपारी दिली. हा व्यवहार सहा लाख रुपयांना ठरला. ठार मारण्यापूर्वी तीन लाख रुपये व मारल्यानंतर तीन लाख रुपये देण्याचे ठरले. अविनाश हा घरातून किती वाजता बाहेर पडतो व दिवसभर कोठे जातो, यावर पाळत ठेवण्यास संशयितांनी सुरुवात केली होती.

सोमवारी (दि. 26) रात्री अविनाशला तमदलगे गावच्या हद्दीत असलेल्या बसवान खिंडीत डोंगरात निर्जनस्थळी संशयितांनी नेले. त्या ठिकाणी डोक्यात दगड घालून त्याचा निर्घृण खून केला. पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर, सत्यवान हाके, सहायक पोलिस निरीक्षक दीपक कदम, पोलिस उपनिरीक्षक प्रवीण माने, पोलिस कर्मचारी युनूस इनामदार, सहायक फौजदार विजय गुरखे, नीलेश मांजरे, ताहिर मुल्ला, वैभव सूर्यवंशी, बाळासाहेब गुत्ते यांच्यासह पथकाने कामगिरी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news