kolhapur | दिरानेच नेला वहिनीचा मृतदेह, पण त्याला कल्पनाच नव्हती!

रुग्णालयात पोहोचल्यानंतर ओळख पटली; उपस्थितांची मनेही हेलावली
kolhapur shocking news
kolhapur | दिरानेच नेला वहिनीचा मृतदेह, पण त्याला कल्पनाच नव्हती!File Photo
Published on
Updated on

आजरा : येथे सोमवारी भिंत कोसळून प्रा. ज्योती कुंभार आणि वैष्णवी भोसले यांचा जागीच मृत्यू झाला. दुसरीकडे, नात्यातील एका दुर्दैवी योगायोगाने सर्वांचे डोळे ओलावले. ज्या रुग्णवाहिकेतून ढिगार्‍याखालून काढलेला मृतदेह रुग्णालयात नेण्यात आला, ती रुग्णवाहिका मृत महिलेच्या दिराचीच होती. मात्र, आपल्याच वहिनीचा मृतदेह आपण वाहून नेतोय याची पुसटशी कल्पनाही त्या चालकाला नव्हती. रुग्णालयात पोहोचल्यानंतर ओळख पटताच दिराला बसलेला धक्का उपस्थितांची मने हेलावणारा होता.

प्रा. कुंभार आणि वैष्णवी भोसले यांचा जागीच मृत्यू झाल्याचे वृत्त समजताच परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. प्रा. कुंभार या महाविद्यालयातील एका शिक्षकाचा वाढदिवस असल्याने थांबणार होत्या, परंतु ‘थोड्या वेळात दवाखान्यात जाऊन येते’ असे सांगून त्या बाहेर पडल्या आणि काळाने त्यांच्यावर घाला घातला. जर त्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी थांबल्या असत्या, तर कदाचित ही वेळ ओढवली नसती, अशी चर्चा त्यांच्या सहकार्‍यांमध्ये सुरू होती. ज्योती या आजरा ज्युनिअर महाविद्यालयात काम करत होत्या. तर वैष्णवी ही मराठी शाळेत शिकत होती. तिची आई ललिता या कमला नेहरू वसतिगृहात अधीक्षक म्हणून काम करत होत्या.

घटनास्थळी नगराध्यक्ष अशोक चराटी, डीवायएसपी रामदास इंगवले, तहसीलदार समीर माने, नायब तहसीलदार विकास कोलते, सहायक पोलिस निरीक्षक बाबासाहेब सरवदे, मंडल अधिकारी सुंदर जाधव, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल पाटील, मुख्याधिकारी सूरज सुर्वे व नगरसेवकांनी भेट दिली.

पोलिस ठाण्याचा फोन बंदच...

प्रा. कुंभार या विद्यार्थीप्रिय प्राध्यापिका म्हणून ओळखल्या जात. दरम्यान, अपघातानंतर प्रशासकीय स्तरावर मात्र मोठा हलगर्जीपणा दिसून आला. पोलिस ठाण्याचा फोन गेल्या काही दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांनी वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकला नाही. यामुळे पोलिसांना घटनास्थळी पोहोचायला तब्बल एक तास उशीर झाला.

माय-लेकीची ताटातूट अन् नातेवाईकांचा आक्रोश

रुग्णालयात जेव्हा नातेवाईक पोहोचले, तेव्हा माय-लेकीची झालेली ताटातूट आणि नातेवाईकांचा आक्रोश पाहून उपस्थित जनसमुदायाला आपले अश्रू आवरता आले नाहीत. या दुर्घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्ष, तहसीलदार आणि पोलिस उपअधीक्षकांसह अनेक प्रशासकीय अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

माय-लेकीच्या ताटातुटीमुळे अश्रू अनावर

रुग्णालयात नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात आक्रोश केला. त्यांचा आक्रोश हृदय हेलावणारा होता. त्यांचा आक्रोश व माय- लेकीची ताटातूट पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news