

कोल्हापूर : नांदणी (ता. शिरोळ) येथील महादेवी हत्तिणीला परत आणण्याबरोबरच खासगी प्राणी संग्रहालयाकडे नेताना मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्या, अशा मागणीचे पत्र काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते, आमदार सतेज पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.
नांदणी मठाकडे 350 वर्षांपासून हत्तीची परंपरा आहे. महादेवी हत्तिणीला न्यायालयाने गुजरातच्या ‘वनतारा’मध्ये हलवण्याचे आदेश दिले. या निर्णयाला विरोध करत गावातील व परिसरातील नागरिकांनी मूक मोर्चा काढला होता. मात्र, दि. 28 जुलै रोजी रात्री महादेवीला वनतारा या खासगी प्राणी संग्रहालयाकडे नेताना नागरिकांचा जमाव हिंसक झाल्याने पोलिसांनी जवळपास 160 नागरिकांवर गुन्हे दाखल केले आहेत. समाजाच्या धार्मिक भावनांचा, तसेच परिसरातील नागरिकांच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून महादेवी हत्तिणीला परत आणण्याबरोबरच नागरिकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, असे या पत्रात आ. सतेज पाटील यांनी म्हटले आहे.
कोल्हापूर : ‘महादेवी’ला परत पाठवण्यासाठी गेल्या दोन दिवसापासून सुरू करण्यात आलेल्या सह्यांच्या मोहिमेत जमा झालेले सव्वा दोन लाख स्वाक्षरींचे अर्ज राष्ट्रपतींकडे पाठविण्यात आले. यावेळी आमदार सतेज पाटील यांनी महादेवी हत्ती परत आणण्याचे सत्ताधार्यांनी केवळ आश्वासन देण्याऐवजी किती दिवसात परत येणार हे ठोसपणे जनते समोर जाहीर करावे, असे आव्हान दिले. शनिवारी दुपारी सतेज पाटील यांच्या हस्ते रमणमळा येथील पोस्ट कार्यालयामध्ये हे सर्व अर्ज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठवण्यात आले. यावेळी माजी आमदार ॠतुराज पाटील, शहराध्यक्ष सचिन चव्हाण, प्रकाश पाटील, राजेश लाटकर, शशिकांत खोत, गोकुळचे संचालक प्रकाश पाटील, बयाजी शेळके, ईश्वर परमार, अर्जुन माने, अमर समर्थ आदी उपस्थित होते. प्रथम नांदणी निशीधीका येथे श्री चक्रेश्वरी देवीची आरती झाल्यानंतर पदयात्रा सुरुवात होणार आहे. त्यानंतर निशीधीका-माणगांवेकोडीहूकोल्हापूर-सांगली महार्गावर येणार आहे. त्यानंतर चिपरी फाटा तमदलगे, मजले फाटा, हातकणंगले-अतिग्रे-चोकाक येथे दुपारी येणार आहे. त्यानंतर हेरले-तावडे हॉटेल-ताराराणी पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयावर सायंकाळी 5 वाजता धडकणार आहे.
जयसिंगपूर : नांदणी येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठातील महादेवी हत्तीण परत मिळण्यासाठी रविवारी सकाळी 5 वाजता पदयात्रेला सुरुवात होणार आहे. दिवसभरात 45 किलोमीटर चालत ही पदयात्रा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. यात हजारो सर्वधर्मीय नागरिक सहभागी होणार असल्याची माहिती माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली आहे.