पेठवडगावच्या विजयसिंह यादव कॉलेजमध्ये बॉम्ब ठेवल्याचा 'कॉल'

Kolhapur bomb threat news | अज्ञाताच्या फोनने वडगावात खळबळ
Bomb threat in Vijaysinh Yadav College  Pethvadgaon
पेठवडगाव येथील विजयसिंह यादव कॉलेजमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या फोनने खळबळ उडाली. Pudhari News Network
Published on
Updated on

किणी, पुढारी वृत्तसेवा : पेठवडगाव येथील लाटवडे रोडवरील विजयसिंह यादव कॉलेजमध्ये बॉम्ब ठेवल्याचा अज्ञाताच्या फोनने आज (दि.२२) सकाळी खळबळ उडाली. मात्र, सर्वत्र शोध घेतला असता हा फेक कॉल असल्याचे सिद्ध झाले. (Kolhapur bomb threat news)

मित्राने बॉम्ब ठेवल्याचा फोन 

याबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी १० वाजून ३ मिनिटांच्या सुमारास पोलिसांच्या ११२ नंबरला अज्ञाताने कॉल करून लाटवडे रोडवरील विजयसिंह यादव कॉलेजमध्ये चाळीस मिनिटांपूर्वी माझ्या मित्राने बॉम्ब ठेवला आहे, असा कॉल आल्याने यंत्रणेची धावपळ उडाली. तातडीने वडगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी दाखल झाले. त्यांनी संपूर्ण परिस्थिती कोल्हापूर मुख्यालयास कळविल्यानंतर कोल्हापूरहून बॉम्ब शोधक व नाशक पथक वडगाव येथे दाखल झाले.

संपूर्ण कॉलेज रिकामे करण्यात आले. कॉलेजला पोलिसांनी गराडा घालत संपूर्ण कॉलेज पिंजून काढले. परंतु, हाती काहीच लागले नसल्याने अज्ञात व्यक्तीने हा फेक कॉल केल्याचे निष्पन्न झाले. कॉल करणाऱ्याचा शोध पोलीस घेत असून अजूनही कॉलेजवर पोलिसांचे पथक थांबून आहेत. (Kolhapur bomb threat news)

Bomb threat in Vijaysinh Yadav College  Pethvadgaon
कोल्हापूर : पिस्तुलाच्या धाकाने 13 लाखांची लूट

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news