वारणा नदीत वाहून गेलेल्या तरुणाचा निलेवाडीच्या हद्दीत मृतदेह सापडला

body of youth swept away in warna river found at nilewadi
आदित्य दाभोळकर Pudhari File Photo
Published on
Updated on

वारणानगर : येथील वारणा नदीवरील चिकुर्डे धरणावरून वाहून गेलेल्या आदित्य दीपक दाभोळकर (वय 22, रा. वारणानगर) या तरुणाचा मृतदेह दुसर्‍या दिवशी सायंकाळी निलेवाडी हद्दीत सापडला. रविवारी सकाळी आदित्य हा आईसोबत अंथरुण धुण्यासाठी गेला होता.

अंथरुण धुऊन झाल्यानंतर आईला घरी सोडून तो पुन्हा पोहण्यासाठी मित्रासोबत चिकुर्डे धरणाजवळ आला. पोहताना पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत गेला. सोमवारी दिवसभर रेस्क्यू टीमने निलेवाडीपर्यंत शोध घेतला. सहाच्या सुमारास चिकुर्डे पुलाच्या खालच्या बाजूला त्याचा मृतदेह सापडला. दोन तालुक्यांच्या हद्दीवर घटना घडल्याने दिवसभर वडगाव व कोडोली पोलिस उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news