Hassan Mushrif | कागल-सातारा हायवेचे निकृष्ट काम करणाऱ्यांना काळ्या यादीत टाका

मंत्री हसन मुश्रीफ यांचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांना आदेश
Hassan Mushrif |
Hassan Mushrif | कागल-सातारा हायवेचे निकृष्ट काम करणाऱ्यांना काळ्या यादीत टाका
Published on
Updated on

कोल्हापूर : कागल-सातारा महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या कामात कंत्राटदारांनी उपकंत्राटदार नेमले आहेत. मात्र, त्यांच्याकडून केल्या जाणाऱ्या कामाचा दर्जा निकृष्ट आहे. उपकंत्राटदारासह त्यांना नेमणाऱ्यांनाही काळ्या यादीत टाका, असे स्‍पष्‍ट आदेश वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांना दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात कागल परिसरात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाची कामे तसेच हॅम योजनेंतर्गत सुरू असलेल्या सिमेंट काँक्रिटीकरण आणि विविध रस्ते कामांचा त्यांनी आढावा घेतला. सध्या सुरू असलेल्या रस्त्यांच्‍या कामांबाबत मुश्रीफ यांनी नाराजी व्यक्त केली. महामार्ग सहापदरीकरण आणि रस्त्यांच्या कामांसाठी प्रमुख कंत्राटदारांकडून विविध ठिकाणी उपकंत्राटदार नेमले आहेत. उपकंत्राटदारांकडून ही कामे करून घेण्यात येत असल्याचे सांगत मुश्रीफ म्हणाले, या कामांचा दर्जा निकृष्ट असल्याचे निदर्शनास येत आहे. अशा कंत्राटदारांना तातडीने काळ्या यादीत टाका.

संयुक्‍त बैठक होणार

राष्ट्रीय महामार्गाच्या कामांबाबत गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, या कामांबाबत ग्रामस्थांकडून वारंवार विविध तक्रारी प्राप्त होत आहेत. वाहतूक कोंडी, सांडपाणी व पावसाच्या पाण्याचा निचरा, पुलांची उंची तसेच पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेतील अडचणींचा या तक्रारीत समावेश आहे, असे सांगत या समस्यांच्या अनुषंगाने तसेच सुरू असलेल्या आणि पूर्ण झालेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी येत्या गुरुवारी कागल नगरपालिका सभागृहात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, संबंधित कंत्राटदार आणि स्थानिक नागरिक यांची संयुक्त बैठक आयोजित करण्याचे आदेशही मुश्रीफ यांनी दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news