Black Magic Rituals | वडकशिवाले स्मशानभूमीत ‘भानामती’चा प्रकार

शिक्षण संस्थेतील पदाधिकार्‍यांचे फोटो टाचण्या मारून अघोरी पूजेचा प्रकार
black magic rituals at vadakshivale cremation ground
Black Magic Rituals | वडकशिवाले स्मशानभूमीत ‘भानामती’चा प्रकारPudhari File Photo
Published on
Updated on

नंदगाव : कोल्हापूर शहरातील एका नामांकित शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष, संचालक व प्राचार्यांनाच कथित भानामती आणि करणीच्या जाळ्यात ओढण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. करवीर तालुक्यातील वडकशिवाले येथील स्मशानभूमीत हा प्रकार घडला. या सर्वांच्या फोटोला टाचण्या मारून केलेल्या अघोरी पुजेने खळबळ उडाली आहे.

वडकशिवाले (ता. करवीर) येथे बाचणी (ता. कागल) कडे जाणार्‍या मार्गावर गावाच्या आग्नेय दिशेला स्मशानभूमी आहे. येथे कोेल्हापूर शहरातील एका शिक्षण संस्थेच्या पदाधिकार्‍यांच्या फोटोंवर हळद-कुंकू, गुलाल टाकून टाचण्या टोचलेल्या आढळल्या. सोबतच पाच नारळ, सहा काळ्या बाहुल्या आणि लिंबू वापरून पूजा मांडण्यात आली होती. ग्रामस्थांनी ही माहिती पोलिस पाटील प्रदीप पाटील यांना दिल्यानंतर त्यांनी इस्पुर्ली पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. तेथील फोटो व सर्व पुजेचे साहित्य ताब्यात घेतले. हा प्रकार कोणी केला याचा शोध पोलिस घेत आहेत. गेल्या चार-पाच महिन्यांपासून अमावस्येच्या रात्री असे प्रकार घडत असल्याचे ग्रामस्थ सांगतात. इतकेच नव्हे, तर स्मशानभूमीतील खांबाला तरुणी व महिलांचे फोटो लावलेल्या काळ्या बाहुल्या बांधून वशीकरणाचे प्रकारही यापूर्वी झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या व्यक्तींचा गावाशी कोणताही संबंध नसताना हा प्रकार कोणी व का केला, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news