डॉ. स्मिता योगेश जाधव यांच्या उमेदवारीने कोल्हापुरात कार्यकर्त्यांचा जल्लोष

फटाक्यांच्या आतषबाजीसह साखर-पेढे वाटून आनंदोत्सव
कोल्हापूर : डॉ. स्मिता जाधव यांना पुणे पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात साखर-पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.
कोल्हापूर : डॉ. स्मिता जाधव यांना पुणे पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात साखर-पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. (छाया : पप्पू अत्तार)
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाकडून पुणे येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. स्मिता योगेश जाधव यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कोल्हापूर शहरात विविध ठिकाणी जल्लोष करण्यात आला.

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी गेल्या काही दिवसांपासून रस्सीखेच सुरू होती. रविवारी दुपारी भारतीय जनता पक्षाकडून डॉ. स्मिता जाधव यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाली. यानंतर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, बिंदू चौक, महाद्वार रोड, निवृत्ती चौक, दसरा चौक, ताराराणी पुतळा, दाभोळकर कॉर्नर, सदर बाजार चौक, व्हिनस कॉर्नर, शिवाजी विद्यापीठ परिसर, सायबर चौक यांसह विविध ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत साखर -पेढे वाटून जल्लोष केला. तसेच, कार्यकर्त्यांनी डॉ. जाधव यांच्या उमेदवारीबद्दल आनंद व्यक्त करून संघटनात्मक पातळीवर मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, दैनिक ‘पुढारी’च्या मुख्य कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकमेकांना साखर-पेढे भरवून जल्लोष केला. डॉ. जाधव यांच्या उमेदवारीचे स्वागत करत जोरदार घोषणाबाजी केली.

निवडणूक हालचालींना वेग

पदवीधर मतदारसंघासाठी भाजपने डॉ. स्मिता जाधव यांच्या नावाची घोषणा केल्याने नवचैतन्य निर्माण झाल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. डॉ. जाधव यांना उमेदवारी मिळाल्याने कोल्हापूरसह विभागात निवडणूक राजकीय हालचालींना वेग आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news