Kaustubh Gawade | ‘शिक्षक-पदवीधर’साठी भाजपची तयारी; सातारा येथे कोअर कमिटीची बैठक

शिक्षकांच्या प्रश्नांसाठी पाठपुराव्याचा कौस्तुभ गावडे यांचा निर्धार
सातारा : येथे आयोजित बैठकीत बोलताना कौस्तुभ गावडे. व्यासपीठावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री शिवेंद्रराजे भोसले आदी.
सातारा : येथे आयोजित बैठकीत बोलताना कौस्तुभ गावडे. व्यासपीठावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री शिवेंद्रराजे भोसले आदी.
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या सातारा जिल्हा कोअर कमिटीची बैठक प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. बैठकीत निवडणुकीचे नियोजन, संघटनात्मक बांधणी, कार्यकर्त्यांची जबाबदारी व मतदारांशी संवाद साधण्याच्या रणनीतीवर चर्चा झाली. शिक्षकांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा करणार असल्याचा निर्धार भाजप महायुतीचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांनी केला.

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील उमेदवार शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांनी शिक्षकांच्या न्याय्य मागण्या व शैक्षणिक क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करण्याचा निर्धार व्यक्त केला. शिक्षकांच्या सेवा-सुरक्षेचे प्रश्न, शैक्षणिक धोरणांमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती व विशेष शिक्षकांच्या नियुक्त्या या मुद्द्यांना प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, आमदार निरंजन डावखरे, धैर्यशील कदम, प्रिया शिंदे, पुणे पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news