

बाजारभोगाव : पन्हाळा तालुक्यातील पाटपन्हाळा येथे गव्यांंचा कळप गावकर्यांच्या नजरेस आला. सायंकाळच्या सुमारास कापलिंगाच्या पायथ्याशी असणार्या दरा नावाच्या शेतात 60 ते 70 गव्यांचा या कळपाने उसाचे व गवातचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.
गव्यांचा कळप बघून तेथे असणार्या शेतकर्यांना धडकी भरली होती. या गव्यांनी शेतीचे नुकसान केले असून ते परत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत गावातील शेतकर्यांनी चिंता व्यक्त केली आहे. गवे कळपाने शेतात येत असल्यामुळे शेतात एकटे काम करणार्या शेतकर्याला याची चाहूल लागली नाही तर धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे वन खात्याने याप्रकरणी लक्ष घालावे, अशी विनंती शेतकरी समाधान इंगळे केली आहे. परिणामी येथील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.