कोल्हापूर : गेल्या दीडशे वर्षांपासून मिठाई आणि नमकीन क्षेत्रांत आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या धारवाडच्या ‘बिग मिश्रा पेढे’ या नामांकित ब—ँडचे भव्य ‘फॅक्टरी आऊटलेट’ आता कोल्हापूरकरांच्या सेवेत रूजू झाले आहे. नागाळा पार्क कमानीजवळ उभारण्यात आलेल्या या अत्याधुनिक 5000 चौरस फूट जागेतील आऊटलेटचे उद्घाटन रविवारी दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव व खासदार शाहू महाराज यांच्या हस्ते झाले. यावेळी महापौर रूपाराणी निकम, ‘बिग मिश्रा पेढे’चे मॅनेजिंग डायरेक्टर संजय मिश्रा उपस्थित होते.
ग्राहकांना उच्च प्रतीची मिठाई थेट उत्पादकांकडून आणि तिही अत्यंत माफक दरात उपलब्ध करून देणे हाच आमचा मुख्य उद्देश आहे, असे संजय मिश्रा यांनी यावेळी सांगितले. या आऊटलेटचे वैशिष्ट्य म्हणजे येथे केवळ किरकोळ विक्रीच नाही, तर लहान व्यावसायिक, बेकरी उत्पादक आणि हॉटेल व्यावसायिकांसाठी 20 ते 30 टक्क्यांपर्यंत विशेष सवलत दिली जाणार आहे.
श्रीधर बोरकर, विष्णू भांडगे, कॉन्ट्रॅक्टर सुनील नागराळे, धनश्री पब्लिसिटीचे ज्ञानदेव पाटील, अक्षय पाटील, क्लायमॅक्सचे उदय जोशी, गुरुदत्त देसाई, अमोल यादव यांच्यासह अनेक मान्यवर आणि ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देशभरात 150 हून अधिक आऊटलेटस् आणि 250 डिस्ट्रीब्युटर्स असलेल्या या कंपनीने आता कोल्हापुरात थेट फॅक्टरी रेटमध्ये माल उपलब्ध करून दिल्याने मिठाई प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 150 वर्षांची परंपरा लाभलेल्या या ब—ँडच्या पेढे, विविध मिठाई आणि नमकीनच्या गुणवत्तापूर्ण उत्पादनांचा लाभ आता कोल्हापूरकरांना घेता येणार आहे. उद्घाटनानंतर पहिल्याच दिवशी ग्राहकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती.