

राशिवडे: पुढारी वृत्तसेवा : राशिवडे बु गटातील दुसऱ्या फेरीअखेर आमदार पी.एन.पाटील यांच्या सतारुढ राजर्षी शाहू शेतकरी आघाडीचे मानसिंग विष्णुपंत पाटील ४७२३, अविनाश तुकाराम पाटील ४२२८, कृष्णराव शंकरराव पाटील, कै. दादासाहेब पाटील कौलवकर आघाडीचे संग्राम अरूण कलिकते ४०६१ मते घेऊन आघाडीवर आहेत. बोलक्या आणी शेलक्या मार्मिक चिठ्ठ्यां मोठ्या प्रमाणात मतपेटीमध्ये टाकून मतदारांनी रोष व्यक्त केला आहे.