Kolhapur Crime : भिवंडी सबजेलमधून पळालेल्या चोरट्यास कोल्हापुरात बेड्या

घरफोडी, दरोड्यासह 30 पेक्षा अधिक गंभीर गुन्ह्यांचे रेकॉर्ड
Kolhapur Crime News
भिवंडी सबजेलमधून पळालेल्या चोरट्यास कोल्हापुरात बेड्या
Published on
Updated on

कोल्हापूर : घरफोडी, चोरी आणि दरोड्यासह 30 पेक्षा अधिक गुन्ह्यांचे रेकॉर्ड असलेल्या आणि भिवंडी सबजेलमधून सुरक्षा यंत्रणांना चकवा देत पसार झालेल्या सराईत चोरट्याला स्थानिक गुन्हे अन्वेषणने कोल्हापुरात गुरुवारी बेड्या ठोकल्या. रवींद्र धनाजी भोसले (वय 24, रा. देवजीनगर, नारपोली, ता. भिवंडी, ठाणे) असे त्याचे नाव आहे. शिवाजी पुलाजवळ पंचगंगा घाटावर सापळा रचून पथकाने कारवाई केली.

भोसले याच्याविरुद्ध ठाणे, पालघरसह नवी मुंबई परिसरात घरफोडी, चोरी, दरोड्यासह अन्य गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचे रेकॉर्ड असल्याचे पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी सांगितले. दि. 15 फेबुवारी रोजी सायंकाळी संशयिताने भिवंडी सबजेलच्या बाथरूममधील लोखंडी ग््राील उचकटून धूम ठोकली. यापूर्वी मुंबई रेल्वे पोलिसांना हिसडा मारून त्याने पलायन केले होते.

मुंबई पुण्यासह कोकण, पश्चिम महाराष्ट्रात शोधासाठी शांतिनगर (ठाणे) पोलिस ठाण्याची यंत्रणा कार्यरत होती. मात्र, त्याचा सुगावा लागत नव्हता. ठाण्यातील कुख्यात गुन्हेगाराने कोल्हापुरात आश्रय घेतल्याची माहिती पोलिस निरीक्षक चव्हाण, संतोष गळवे, आतिश म्हात्रे, सागर माने यांना मिळाली. पथकाने सापळा रचून रवींद्र भोसलेला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली. संशयिताच्या प्राथमिक चौकशीनंतर त्याला शांतिनगर पोलिसांच्या हवाली करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news