

दानोळी : येथील भरतेश टोपगोंडा यांच्या खून प्रकरणातील मारेकर्यांना तातडीने अटक करा, या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. संशयितांना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. बुधवारी गावातून मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. मारेकरर्यांना अटक होईपर्यंत गाव बंद ठेवण्यात येणार आहे, असे निर्णय मंगळवारी रात्री झालेल्या बैठकीत घेण्यात आले.
दरम्यान, पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांनी याप्रकरणाची सखोल चौकशी करणार आहे व गुन्हेगारांना जास्तीजास्त शिक्षा मिळेल यासाठी प्रयत्न केली जातील. मृतदेह ताब्यात घ्यावा, अशी विनंती केली; मात्र ग्रामस्थांनी रात्री उशिरापर्यंत मृतदेह ताब्यात घेतलेला नव्हता. भरतेश टोपगोंडा यांच्या अपहरणानंतर झालेल्या खुनाच्या घटनेनंतर दानोळी ग्रामस्थांच्या वतीने रात्री तातडीने बैठक घेण्यात आली. यावेळी दोन कुटुंबे उघड्यावर पडलेली आहेत. हे दोन्ही आरोपी मूळ गावचे नाहीत. असे अनेक गुन्हे घडत आहेत. त्यामुळे गावाचे नाव बदनाम होत आहे. बैठकीत आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी, यासाठी प्रयत्न करणे. कमिटी नेमून गावातील गुन्हेगारी प्रवृत्ती मोडीत काढणे आदी ठराव केले. यावेळी सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते.
अपर पोलिस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, पोलिस अधीक्षक अमोल ठाकूर आणि आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपींनी यापूर्वी एका मोबाईल दुकानदाराच्या अपहरणाचा कट रचला होता, अशी कबुलीही तपासादरम्यान दिली आहे. मिरज येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
...तर भरतेशचा जीव वाचला असता
भरतेश टोपगोंडा या तरुणाचा खंडणीसाठी झालेला खून हा दानोळीकरांच्या मनाला चटका लावणारा ठरला. पोलिसांनी वेळेत दखल घेतली असती, तर भरतेश वाचला असता, ही लोकभावना दाटली आणि पोलीस अधिकार्यांना ग्रामस्थांच्या रोशाला सामोरे जावे लागले. रात्री अकरा वाजता पोलीस ठाण्यामध्ये जाऊन पूर्ण माहिती दिली. अपहरणकर्त्याचे कॉल रेकॉर्डिंग ऐकवले तरीसुद्धा पहाटे साडेतीनपर्यंत ताटकळत ठेवत फक्त मिसिंगची नोंद घेतली; पण लगेच दखल घेऊन तपास केला असता, तर भरतेशचे प्राण वाचले असते, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.
जिल्हा पोलीसप्रमुखांनी घेतली माहिती
घटनेनंतर जिल्हा पोलीसप्रमुख योगेशकुमार गुप्ता यांनी जयसिंगपूर पोलिसांत तातडीने धाव घेऊन घटनेची माहिती घेतली. तसेच दानोळी येथील नागरिक मोठ्या संख्येने एकत्रितरीत्या आले होते. यातील आणखी आरोपींना ताब्यात घ्यावे, अशा मागणीचे निवेदन देण्यात आले. दरम्यान, याबाबतचा तपास अपर पोलीस अधीक्षक यांच्याकडे देत आहे. या प्रकरणाचा सखोल तपास केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.