Bidri Election : बिद्रीच्या कुरुक्षेत्रावर नात्या गोत्यात लढाई

Bidri Election : बिद्रीच्या कुरुक्षेत्रावर नात्या गोत्यात लढाई

गुडाळ; आशिष पाटील : बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीतील दोन्ही आघाड्यांच्या उमेदवारांवर नजर टाकली असता ही लढाई नात्यागोत्यातच असल्याचे स्पष्ट होत आहे. | Bidri Election

विद्यमान चेअरमन के पी पाटील आणि त्यांचे दाजी ए वाय पाटील आमने सामने आहेत. गोकुळचे माजी चेअरमन रणजितसिंह पाटील आणि त्यांचे बंधू विद्यमान संचालक प्रवीणसिंह पाटील हेही आमने-सामने आहेत. विद्यमान व्हाईस चेअरमन विठ्ठलराव खोराटे आणि त्यांचे भाचे विद्यमान संचालक राजेंद्रदादा पाटील आमने सामने आहेत. तर के पी पाटील आणि त्यांचे भाचे सुनीलराज सूर्यवंशी मात्र एकाच पॅनल मध्ये आहेत. केपींचे व्याही गणपतराव फराकटे सुद्धा एकाच पॅनलमध्ये आहेत.

कोकण केसरी के जी नांदेकर आणि त्यांचे जावई जयवंत पाटील हे दोघेही विरोधी आघाडीचे उमेदवार आहेत. एकंदरीत बिद्रीची लढाई ही पै -पाहुण्यांच्या मध्येच रंगतदार होणार आहे.

सत्तारूढ आघाडीत एक नंबर गटात तीन राजूंना उमेदवारी. या गटात गोकुळचे विद्यमान संचालक राजेंद्र मोरे, बिद्रीचे विद्यमान संचालक राजेंद्र पाटील, आणि राजेंद्र भाटळे या तीन राजूंना उमेदवारी मिळण्याचा अनोखा योगायोग साधला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news