Battery waste recycling | बॅटरी कचरा दुर्मीळ धातूंची नवी खाण; 51 टक्के पुनर्वापर

कचर्‍यातून 2 हजार टन कोबाल्ट, दीड हजार टन कॉपर, 436 टन लिथियम झाले रिसायकल
Battery waste recycling
Battery waste recycling | बॅटरी कचरा दुर्मीळ धातूंची नवी खाण; 51 टक्के पुनर्वापर
Published on
Updated on

आशिष शिंदे

कोल्हापूर : ई-व्हेईकलमध्ये वापरल्या जाणार्‍या लिथियम-आयन सेल्सपासून ते विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये वापरल्या जाणार्‍या बॅटरीजमुळे देशभरात बॅटरी कचर्‍याचे प्रमाण वेगाने वाढत आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार, देशभरात दरवर्षी तब्बल 1,938,034.28 टन बॅटरी कचरा तयार होत असून, यातील 51 टक्के कचर्‍यावर प्रत्यक्ष रिसायकल (पुनर्वापर) प्रक्रिया केली जाते. रिसायकल झालेल्या या कचर्‍यातून कोट्यवधी रुपयांच्या मूल्याचे दुर्मीळ आणि महागडे धातू पुन्हा मिळत आहेत. यामुळे बॅटरी कचरा दुर्मीळ धातूंची नवी खाणच म्हणावे लागेल.

सध्या अधिकृत रिसायकलिंग यंत्रणांमधून लेड, लिथियम, कोबाल्ट, निकेल, मँगनीज, अ‍ॅल्युमिनियम, आयर्न, कॉपर आणि झिंक यांसारखे महागडे आणि दुर्मीळ धातू पुन्हा मिळत आहेत. रिसायकल झालेल्या कचर्‍यातून मिळालेले 9.79 लाख टन लेड, 2,573 टन कोबाल्ट, 1,426 टन कॉपर, 1,130 टन अ‍ॅल्युमिनियम, तसेच 436 टन लिथियम ही आकडेवारी वाढत्या कच्च्या मालाच्या गरजा स्पष्टपणे कमी करू शकते. 2022 मध्ये लागू झालेल्या बॅटरी वेस्ट मॅनेजमेंट नियमांनुसार, देशात ईपीआर (एक्स्टेंडेड प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटी) व्यवस्था अनिवार्य करण्यात आली आहे. यामध्ये बॅटरी उत्पादकांनी विक्री केलेल्या बॅटर्‍यांचे संकलन, रिसायकलिंग आणि पुनर्प्राप्त धातूंची नोंद ठेवणे बंधनकारक आहे.

तब्बल 49 टक्के कचरा प्रक्रियेविनाच

देशात दरवर्षी 1,938,034 टन बॅटरी कचरा तयार होतो. यातील 9,86,600 टन कचरा प्रत्यक्ष रिसायकल केला जातो. तर सुमारे 9,51,400 टन कचरा इतका मोठा हिस्सा अद्याप तसाच राहतो. बॅटरींच्या चुकीच्या विल्हेवाटीमुळे प्रदूषणाचा धोका वाढतोच; पण त्याचबरोबर प्रचंड आर्थिक मूल्य असलेले धातू वाया जाण्याचीही शक्यता निर्माण होते. येणार्‍या काळात पुनर्प्रक्रिया प्रकल्पांची संख्या वाढवून रिसायकलिंग ध्येय 100 टक्के पूर्ण केल्यास बॅटरी कचर्‍याचा राक्षसही गाडला जाईल.

बॅटरी कचरा म्हणजे काय?

बॅटरी कचरा म्हणजे वापरानंतर निकामी झालेल्या सर्व प्रकारच्या बॅटर्‍यांचा कचरा. यात ई-व्हेईकलमध्ये वापरल्या जाणार्‍या लिथियम-आयन बॅटर्‍या, मोबाईल आणि लॅपटॉप बॅटर्‍या, पॉवर बँक, चार्जिंग उपकरणांमध्ये असलेल्या बॅटर्‍या, इन्व्हर्टर बॅटर्‍या, लीड-अ‍ॅसिड बॅटर्‍या, तसेच विविध औद्योगिक आणि वैद्यकीय उपकरणांमध्ये वापरल्या जाणार्‍या बॅटर्‍या यांचा समावेश होतो.

बॅटरी रिसायकलमधून मिळाले हे घटक

1) लेड 9,79,100.759 टन

2) कोबाल्ट 2,573.737 टन

3) कॉपर 1,426.999 टन

4) अ‍ॅल्युमिनियम 1,130.782 टन

5) आयर्न 925.058 टन

6) निकेल 508.442 टन

7) मँगनीज 440.215 टन

8) लिथियम 436.102 टन

9) झिंक 56.883 टन

10) कॅडमियम 1.29 टन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news