Balumama Temple Scam | बग्गी प्रमुखांची होणार चौकशी

बाळूमामा देवस्थान घोटाळा; जिल्ह्याबाहेर असल्यामुळे तपासात अडथळे
Balumama temple
Balumama Temple Scam | बग्गी प्रमुखांची होणार चौकशीFile Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : आदमापूर येथील संत बाळूमामा देवस्थान ६० कोटी ७५ लाखांच्या गैरव्यवहारप्रकरणी बाळूमामा मेंढरांच्या बग्गीप्रमुखांचीही चौकशी होणार आहे. बग्गीमध्ये नेमकी किती उलाढाल होते, त्यात काही अनियमितता आहे काय, याची पडताळणी होणार आहे. दरम्यान, सध्या बग्गी जिल्ह्याबाहेर असल्यामुळे तपासात अडथळे येत असल्याचे पोलिस उपअधीक्षक सुवर्णा पत्की यांनी सांगितले.

संत बाळूमामा देवस्थान समितीमध्ये ६० कोटी ७५ लाख रुपयांच्या घोटाळाप्रकरणी धर्मादाय निरीक्षक रागिणी खडके व संत बाळूमामा देवस्थान सचिव रावसाहेब कोणकेरी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण करत आहे. देवस्थानकडे असलेल्या १९ बग्ग्यांचीही यामध्ये चौकशी होणार आहे. बग्गी प्रमुखावर मेंढ्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी असते. यासाठी देवस्थानकडून त्यांना वार्षिक मेहनतानाही दिला जातो. अनेक बग्ग्यांना भाविकांनीच वाहने आणि दुचाकी दिल्या असून, त्या देवस्थानच्या नावावर करण्यात येणार आहेत.

शिधा, देणगीचेही रेकॉर्ड तपासणार

देवस्थानला शिधा, वर्गणी, खोबरेल तेलाची निर्मिती, बकऱ्यांची विक्री, जमिनींचे खरेदी-विक्री व्यवहार यातून उत्पन्न मिळत असते. देवस्थानच्या विविध उत्पन्नाच्या मार्गांचा तपास सुरू आहे. देवस्थान जमिनीच्या खरेदी - विक्रीमध्येही अनियमितता आहे काय, हे ही तपासण्यात येणार आहे.

विश्वस्तांची धर्मादायकडे हजेरी

आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी सात ते आठ विश्वस्तांची चौकशी केली आहे. मात्र, उर्वरित विश्वस्त धर्मादाय येथील सुनावणीस हजेरी लावत असल्यामुळे ते गैरहजर आहेत. त्यांना हजर राहण्याची नोटीस त्यांना देण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news