Sant Balumama Palki | बाळूमामांच्या बकऱ्यांसह पालखीचे कौलवमध्ये उत्साहात स्वागत: दर्शनासाठी भाविकांची गर्दी

सलग तीन दिवस पंचक्रोशीतील भाविकांचा दर्शनासाठी महापूर
Balu Mama Palki Welcome Kaulav
कौलव येथे महाआरतीला जमलेली भाविकांची गर्दीPudhari
Published on
Updated on

Balu Mama Palki Welcome Kaulav

कौलव : श्रीक्षेत्र आदमापुर येथील श्री बाळूमामा देवस्थानच्या बग्गा क्रमांक सहा ची पालखी व बकऱ्यांचे कौलव येथे आगमन झाले आहे. सलग तीन दिवस पंचक्रोशीतील भाविकांचा दर्शनासाठी महापूर लोटला आहे.

कौलव येथे प्रथमच पालखी व बकऱ्यांचे आगमन झाल्यामुळे परिसरातील भाविकांमध्ये मोठी उत्सुकता होती . ठिकपुर्ली येथून आलेल्या या पालखीचे ग्रामस्थांनी वाद्यांच्या गजरात व भंडाऱ्याच्या उधळणीत बाळूमामाच्या नावाने चांगभलं च्या जयघोषात मोठ्या उत्साहाने स्वागत केले.

Balu Mama Palki Welcome Kaulav
Balumama Mandir Closed | आदमापूरचे बाळूमामा मंदिर ३ ते ६ मार्च दरम्यान दर्शनासाठी बंद; 'हे' आहे कारण

पालखी मार्गावर रांगोळ्यांसह सजावट करण्यात आली होती .ग्रामपंचायत गावातील सर्व संस्था ,तरुण मंडळे व भाविकांनी दररोज विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. पहाटे अभिषेक व काकड आरती व नैवेद्य अर्पण केला जातो. संध्याकाळी प्रवचन, महाआरती, महाप्रसादाचे व भजनाचे आयोजित केले जात आहे .दररोज संध्याकाळी होणाऱ्या महाप्रसादास पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी गर्दी केली आहे.

बकऱ्यांच्या कळपाच्या ठिकाणी दररोज मेंढी पूजन व ओटी भरणी साठी महिलांची अक्षरशः रिघ लागली आहे .दररोज विविध गल्ल्यातून व बाहेरगावाहून महिला गारवा व महाप्रसादासाठी साहित्य घेऊन वाजत गाजत येत आहेत. शनिवारी या पालखीचे कौलवमधून प्रस्थान होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news