Balumama Bhandara Yatra 2026 | आजपासून सुरू झालेल्या बाळूमामाच्या भंडारा यात्रेवर 183 CCTVचा वॉच

आज रविवारी (दि.१५ मार्च) रथ मिरवणूक, सोमवारी महाप्रसाद, मंगळवारी पालखी सोहळा
Balumama Bhandara Yatra 2026 | आजपासून सुरू झालेल्या बाळूमामाच्या भंडारा यात्रेवर 183 CCTVचा वॉच
Published on
Updated on

मुदाळतिट्टा : लाखो भाविकभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या भुदरगड तालुक्यातील श्रीक्षेत्र आदमापूर (ता.भुदरगड) येथील सद्गुरु बाळूमामा यांच्या पाच दिवस चालणाऱ्या भंडारा यात्रेवर 183 सीसीटीव्ही वॉच ठेवणार आहेत. भाविकांची मोठी गर्दी या यात्रेला होणार असल्याचे संकेत मिळाल्यामुळे यावर्षी एवढ्या मोठ्या संख्येने सीसीटीव्ही जोडून संपूर्ण यात्रा निगराणीखाली आणण्याचे महत्त्वपूर्ण काम करण्यात आले आहे.

रविवार दिनांक 15 रोजी जागर यात्रेचा मुख्य दिवस असून या दिवशी निढोरी ते आदमापूर अशा मार्गावर बाळूमामाच्या रथाची मिरवणूक होणार आहे. या रथामध्ये बाळुमामाची 138 किलो वजनाची चांदीची मूर्ती तसेच बाळूमामाच्या मेंढी माऊलींच्या दूधाचे कलश मंदिरामध्ये आणण्यात येणार आहेत. सोमवार दि. 16 रोजी पहाटे कृष्णात डोणे महाराज यांची भाकणूक व महाप्रसाद कार्यक्रम होईल मंगळवार दि. 17 रोजी बाळूमामा चा पालखी सोहळा संपूर्ण आदमापूर गावामध्ये दिवसभर होणार असून ग्रामदैवत हनुमान व मरगूबाई मंदिराकडे भेटीसाठी जातो.

यात्रा काळात पाच दिवस एकेरी वाहतुकीची यंत्रणा प्रभावीपणे राबवण्याचा प्रशासनाचा मानस असून पोलीस यंत्रणा दक्ष आहे. मुरगुड सोनाळी बिद्री कोल्हापूर गारगोटी असा एक मार्ग तर मुदाळतिट्टा हुतात्मा स्वामी वारके सुतगिरणी वाघापूर पाटी निढोरी मुरगुड असा दुसरा मार्ग असणार आहे.यात्रा काळात शांतता राखण्याचे व देवालय समिती व आदमापूर ग्रामस्थांना भक्तांनी सहकार्य करावे असे आव्हान देवस्थान समितीचे अध्यक्ष धैर्यशील भोसले कार्याध्यक्ष पुंडलिक होसमणी यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news