Kolhapur Municipality | मनपाचा अजब कारभार; म्हणे, खराब रस्त्याला पाऊस जबाबदार

कारवाईची नो गॅरंटी; लाडके ठेकेदार सहिसलामत
Kolhapur Municipal Corporation
Kolhapur Municipal CorporationOnline Pudhari
Published on
Updated on

कोल्हापूर : डॅनियल काळे

वॉरंटीतील रस्ते खराब झाल्यास किंवा खड्डे पडल्यास ठेकेदाराला जबाबदार धरून कारवाई करण्याच्या सूचना मनपा प्रशासकांनी दिल्या; पण त्याला केराची टोपली दाखविली. रस्ते पावसामुळे खराब झाल्याचा साक्षात्कार अधिकारी, सल्लागारांना झाला अन् लाडके ठेकेदार सहिसलामत सुटले. (Kolhapur Municipal Corporation)

आजवर हाच प्रकार महानगरपालिकेत सुरू आहे. त्यामुळे जबाबदार ठेकेदारांची नावे पुढे यायला तयार नाही. दर्जेदार रस्त्यांचे दिवास्वप्नच रस्ते विकास प्रकल्प शहरावर लादताना रस्त्यांबाबत प्लॅन तयार झाला आणि तो लोकांच्या मनावर बिंबवला, जणू कोल्हापूरचे रूपडेच पालटणार आहे.

प्रत्यक्षात रस्ते अस्तित्वात आले तेव्हा बेडूकउड्या मारल्यासारखा अनुभव येत असल्याचे अभियंत्यांनीच सांगितले. ५ ते ६ वर्षांपूर्वी रंकाळा टॉवर ते तांबट कमान या रस्त्याचा असा व्हिडीओ प्रसारित केला की, हा रस्ता कोल्हापुरातला आहे की परदेशातला असा प्रश्न निर्माण झाला. प्रत्यक्षात या रस्त्यावरून गेले की, कंबरडे मोडते.

सर्वच रस्त्यांची हीच अवस्था आहे. चप्पल लाईनचा रस्ता आता काँक्रिटचा केला जात आहे; पण यापूर्वी अनेकदा या रस्त्यावर कोट्यवधी रुपयांचा चुराडा झाला आहे. रस्ते करताना प्राधान्यक्रम नीट ठरवला जात नाही. आधी कामाचा ठेकेदार निश्चित होतो.

मग, रस्त्याचा निधी आणि ठिकाण ठरते. प्रमुख रस्ते विकासापासून वंचितच राहतात आणि इतरत्र निधी खर्च होतो. रस्त्याचा डीएसआरप्रमाणे अभ्यास केला, तर आजवर झालेल्या खर्चात अधिक किलोमीटरचे रस्ते होणे अपेक्षित होते. सरफेस ड्रेन वॉटरची सिस्टीमच नाही. त्यामुळे पाणी रस्त्यावर साचते. त्यामुळे रस्त्यावर खड्डे पडणे आणि रस्ते वाहून जाणे असे प्रकार घडतात.

त्या ठेकेदारांची नावे गुलदस्त्यात का?

शहरात २०२१ पासून २०० कोटींचे रस्ते केले आहेत. यामध्ये बहुतांश प्रभागांतर्गत रस्त्यांचा समावेश होता. यापैकी काही रस्ते खराब आहेत.

प्रत्येक विभागीय कार्यालय स्तरावर त्यांची पाहणी सुरू असल्याचे सांगण्यात येते. अद्याप ती पूर्ण झालेली नाही. ही नावे गुलदस्त्यात का, असा सवाल उपस्थित होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news