Ashwini Bhide Mumbai commissioner | जयसिंगपूरच्या अश्विनी भिडे मुंबईच्या आयुक्त

Ashwini Bhide Mumbai commissioner |
मुंबई : येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या पहिल्या महिला आयुक्त अश्विनी भिडे यांचा सत्कार केला.
Published on
Updated on

जयसिंगपूर : मुंबईच्या प्रशासकीय यंत्रणेत निर्णय क्षमता, प्रकल्प अंमलबजावणीतील काटेकोरता आणि नागरिकांशी थेट संवाद या त्रिसूत्रीमुळे ओळख निर्माण केलेल्या जयसिंगपूरची कन्या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी अश्विनी भिडे मुंबई महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त ठरल्या.

अश्विनी भिडेंचे वडील स्टेट बँक ऑफ इंडियात कार्यरत होते, तर आई गृहिणी आहे. त्यांचे शालेय शिक्षण जयसिंगपूरच्या मराठी माध्यमात झाले. कला शाखेत पदवी घेतल्यानंतर यूपीएससी परीक्षेची तयारी केली आणि त्या आएएस झाल्या आहेत. त्यानंतर पहिली नियुक्ती इचलकरंजी येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून झाली होती. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी काम केले. 2004 मध्ये राज्यपालांच्या उपसचिवपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. त्यानंतर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात अतिरिक्त महानगर आयुक्त म्हणून नियुक्ती झाली. शालेय शिक्षण आणि क्रीडा सचिव म्हणूनही त्यांनी प्रशासकीय सुधारणा, डेटाबेस डिजिटलायझेशन आणि प्रक्रियात्मक पारदर्शकता यावर भर दिला होता.

त्यांनी 10 वर्षे मुंबई मेट्रो प्रकल्पासाठी काम केले. त्यांनी संबंधित विभागांमधील काही निवृत्त अधिकार्‍यांची टीम तयार केली. या टीममार्फत संंबंधित अधिकारी, कर्मचारी यांना प्रकल्पाबद्दलची माहिती आणि प्रेझेंटेशन दिले. यामुळे प्रकल्पाने वेग धरला आणि मुंबई मेट्रो प्रवाशांच्या सेवेत रुजू झाली. त्यांच्या निवडीनंतर जयसिंगपुरात आनंदोत्सव साजरा होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news